कलापिनी संगीत विद्यालयाचे तब्बल ४ विद्यार्थी तबला विशारद परिक्षा पास तर एक विद्यार्थी तबला अलंकार
पंढरपूरः- भारतासह जगभरात संगीत शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या पंढरपूरातील कलापिनी संगीत विद्यालय चे तब्बल ४ विद्यार्थी तबला विशारद हि परिक्षा प्रथम क्रमांकासह उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये शिवराज दत्तात्रय भुजबळ,पार्थ प्रसाद उत्पात,ओंकार विठ्ठल वाघमारे,रोहित बाळकृष्ण सुतार यांचा समावेश आहे.तर देवेश दिनेश खरे हा तबला अलंकार या परिक्षेत पास झाला आहे.या सर्व विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध तबला वादक व आदर्श गुरू पं.दादासाहेब पाटील व विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.



