शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

 

-----------------------------------------------

*सोलापूर दिनांक 18/ 2/ 2023 केंद्रीय निवडणूक आयोगाचा सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवून शिवसेना व धनुष्यबाण वादा बाबत दिलेल्या निकालाचे फळ केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला भोगावे लागतील असा इशारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग व केंद्रातील भाजपा सरकारला दिला.                                        केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची या संघर्षाबाबत दिनांक 17 फेब्रुवारी रोजी जो निकाल दिला त्या निकालाच्या विरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निषेध करण्याचा कार्यक्रम जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहरप्रमुख विष्णू कारामपुरी (महाराज ),जिल्हा संघटक प्रा. अजय दासरी ,युवा सेनेचे बालाजी चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्व उपजिल्हाप्रमुख, उपशहर प्रमुख, आणी शिवसेना संलग्न संलग्न सर्व संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.  प्रारंभी बोलविलेला तातडीच्या बैठकीत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी १} सोलापूरचे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहोत 2)केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जाहीर निषेध ३)केंद्रातील भाजपा सरकारचा जाहीर निषेध असे ठराव पारित करण्यात आले. तेव्हा उपस्थित सर्व शिवसैनिक एकमताने ठराव मंजूर केले यावेळी प्रा.अजय दासरी  जिल्हाप्रमुख अमर पाटील शरद कोळी यांनी निषेधावर भाषण केले तर प्रास्ताविक शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी केले त्यानंतर सर्व शिवसैनिकांनी शहर कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उभे राहून निवडणूक आयोगा विरुद्ध निषेध नोंदवून निदर्शने केली या निदर्शनात उद्धवसाहेब तुम  आगे बढो हम तुम्हारे साथ है ,केंद्रीय निवडणूक आयोगाचा धिक्कार  असो ,एकनाथ शिंदे हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, हमसे जो ठकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा, एक वडा दोन पाव निवडणूक आयोग भाडखाव, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा जोरजोरात घोषणा दिल्या जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज )यांच्या नेतृत्वाखाली निषेध निदर्शने कार्यक्रमात जिल्हाप्रमुख अमर पाटील संतोष केंगनाळकर भीमाशंकर मेत्रे प्रताप चव्हाण ,संतोष पाटील ,आनंद बुखानुरे ,राजू बिराजदार ,रेवन पुराणिक ,अमित भोसले ,दीपक गवळी ,निरंजन बोधुल, धनराज जानकर ,संभाजी कोंडगे, सचिन गंदुरे ,संदीप बेळमकर ,संजय गवळी ,रविकांत कांबळे, संगमेश्वर बिराजदार, सोमनाथ पात्रे ,रोहित तडवळकर ,विठ्ठल कुराडकर, राम चव्हाण ,यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

-----------------------------------------------



*शिवसेना व धनुष्यबाण या वादाचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने हेतूस्फुरक दिल्याच्या निषेधार्थ सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आले सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज), युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी, प्रा. अजय दासरी व शिवसेनेचे सर्व उपजिल्हाप्रमुख ,उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख युवा सैनिक शिव सेना संलग्न सर्व संघटना पदाधिकारी व शिवसैनिक दिसत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form