मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे राज्याचे संयोजक आदरणीय गणेश काका जगताप राज्याचे सहसंयोजक राजीवजी शर्मा , विभागीय संयोजक देशमुख , पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक समाधानजी गायकवाड उपस्थित होते
करकंब प्रतिनिधी -
दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभागाची सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा संयोजक जिल्हा सहसंयोजक तालुका संयोजक तालुका सहसंयोजक या सर्वांसाठी मार्गदर्शनासाठी या बैठकीचे आयोजन केलेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या फोटो पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज ग्रामविकास या विभागातील सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुका संयोजक सहसंयोजक शहर संयोजक, सहसंयोजक यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे राज्याचे संयोजक आदरणीय गणेश काका जगताप राज्याचे सहसंयोजक राजीवजी शर्मा , विभागीय संयोजक देशमुख , पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक समाधानजी गायकवाड उपस्थित होते.
सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्या भारत मातेला अतिउच्च शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करणारे वंचित समाजातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान
नरेंद्र मोदी व आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना निर्माण केलेल्या आहेत. व ह्या योजना आपण सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली आहे. व आज आपण याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व ग्रामविकास या आयामाच्या माध्यमातून शासनाच्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण केलेले आहे. व आपण सर्व जिल्हा व तालुका संयोजक सहसंयोजक यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन शासनाच्या ज्या काही योजना आहेत या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पंचायतराज ग्रामविकास विभागाचे राज्याचे संयोजक गणेश काका जगताप यांनी केले.
तसेच पंचायत राज ग्रामविकास या विभागाचे राज्याचे सहसंयोजक राजीवजी शर्मा विभागीय संयोजक देशमुख पश्चिम महाराष्ट्रचे सहसंयोजक समाधान गायकवाड सोलापूर जिल्हा संयोजक दत्तात्रेय मोरे महाराज यांनी आपल्या मनोगता मध्ये पंचायत राज व ग्रामविकास या आयामाच्या रचनेविषयी सविस्तर माहिती सांगून भविष्यामध्ये या आयमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रत्येक गावात आपल्या रचनेच्या माध्यमातून लोकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
या बैठकीमध्ये जिल्हा संयोजक जिल्हा सहसंयोजक शहर संयोजक, सहसंयोजक तालुका संयोजक तालुका सहसंयोजक यांना निवडीचे पत्र देऊन त्यांना त्यांच्या पुढील कार्यास पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे राज्याचे संयोजक, सहसंयोजक, विभागीय संयोजक पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक यां वरिष्ठ मंडळींनी शुभेच्छा दिल्या.
