कल्पतरू उत्तुंग भरारी दिवांग्य बहु.संस्थेचा मार्गदर्शन मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या, मागणी व अडचणी  शासन दरबारी मांडून योग्य पद्धतीने सोडवल्या जातील --आ.समाधान आवताडे
पंढरपूर --प्रतिनिधी 
कल्पतरू उत्तुंग भरारी दिव्यांग बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने पंढरपूर येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी दिव्यांग बांधव आरोग्य तपासणी, दिव्यांग प्रमाणपत्र मार्गदर्शन,दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा तसेच दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजना मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
या कार्यक्रमात प्रमुख मान्यंवर म्हणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार  समाधान दादा आवताडे साहेब हे  उपस्थित राहून सर्व दिव्यांग बांधवांना व भगिनींना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी बोलताना  त्यांनी  दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या, मागणी व अडचणी आपण त्या शासन दरबारी मांडून योग्य पद्धतीने सोडवल्या जातील, तसेच त्यांच्या न्याय, हक्कासाठी  मी स्वतः जातीने लक्ष घालून दिवांग्य बांधवांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले 
     
यावेळी कल्पतरू उत्तुंग भरारी दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,दिवांग्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form