विठ्ठल भक्ताने दिली २१लाखाची देणगी

पंजाब येथील विठ्ठल भक्त प्रकाश शिंग गील यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास दिली देणगी 

पंढरपूर --प्रतिनिधी 
 रविवार दि. ०१/०१/२०२३ पौष शु. १० रोजी इंग्रजी नवीन वर्षाच्या औचित्यावर श्री प्रकाश शिंग गील राहणार मोहाली, पंजाब मे. युनीव्हर्सल ब्रदर्स ग्रुप प्रोडक्शन हाऊस, मोहाली, पंजाब यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस रक्कम रू २१,००,०००/- अक्षरी एकवीस लाख रूपयेचा धनादेश देणगी स्वरुपात दिली.
त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती च्या वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य श्री संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते श्री प्रकाश शिंग गील यांचा सत्कार "श्री" ची प्रतिमा, उपरणे, श्रीफळ देऊन करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form