भंडीशेगांव येथे नववर्षाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान

सरपंच मनीषा येलमार यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे आवाहन केले होते,या अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीनाथ विद्यालय,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
भाळवणी-- प्रतिनिधी
भंडीशेगांव ता.पंढरपूर येथे नववर्षाच्या निमित्ताने संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी सरपंच मनीषा येलमार व उपसरपंच विजय पाटील हे उपस्थित होते.जगभरात नवीन वर्षाच्या वेगवेगळ्या प्रकाराने स्वागत करत असताना भंडीशेगांव येथे मात्र सरपंच मनीषा येलमार यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे आवाहन केले होते,या अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीनाथ विद्यालय,ग्रामपंचायत, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

 मुंबई येथील उद्योजक अजित कंडरे यांनी मागील चार वर्षांपासून गावात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात सुरुवात केली होती, याच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे जाऊन सरपंच मनीषा येलमार यांनी हे अभियान राबवले,भंडीशेगांव येथे नेहमीच प्रत्येक चांगल्या गोष्टी राबवण्यासाठी अग्रेसर असते याच गावात मागील पंचवीस वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षक प्रशांत वाघमारे यांनी कचऱ्याची होळी साजरी केली होती,यामध्ये प्रामुख्याने गावातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली होती,गावातील विद्यार्थाना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.हेडगेवार वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व गुणवंतांचे सत्कार कारण्याचे काम सुरू आहे, तसेच माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बेचाळीस एकर वरती आठरा हजार झाडे सामाजिक वनीकरण वन विभाग, व ग्रामस्थ यांनी लावली आहेत,विधान परिषद चे माजी आमदार प्रशांत परिचारक हे गावात विविध विकास कामाच्या निमित्ताने आले असता सत्कार न स्वीकारता वृक्षारोपण करून उदघाटन करून एक आदर्श निर्माण केला आहे, सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना चे चेअरमन कल्याणराव काळे यांनी शालेय विद्यार्थ्यांना एकत्रित करून ड्रीम गार्डन येथे स्वच्छता अभियान राबवले होते,अश्या प्रकारे गावात नेहमी विविध प्रकारच्या अभियान राबविण्यात गाव अग्रेसर आणल्याचे मत सरपंच मनीषा येलमार व उपसरपंच विजय पाटील यांनी व्यक्त केले,आज या अभियानात श्रीनाथ विद्यालय परिसर,जिल्हा परिषद शाळा परिसर,श्रीनाथ मंदिर परिसर स्वच्छ केला.
या स्वच्छता अभियान मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक बाळासाहेब काळे,श्रीनाथ विद्यालय चे मुख्याध्यापक विश्वजित माने,डॉ .हेडगेवार वाचनालय चे मारुती गिड्डे,ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील,छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे,डॉ.श्रीधर येलमार,प्रशांत कांबळे,पंचायत समिती सदस्य पल्लवी येलमार,श्रवण येलमार,विकास बडके,सह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form