वाचाल तर टिकाल, वाचनाचा छंद सर्वांनी जोपासला पाहिजे
पंढरपूर -प्रतिनिधी
पंढरपूर येथे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ वाचक श्री पा. वा. उत्पात यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
यावेळी संस्थेचे चिटणीस श्री. द.वा वाईकर उपस्थित होते. यावेळी श्री वाईकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले तसेच डिजिटल जगात वाचक संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालये सदृढ झाली पाहिजे तसेच वाचनाची आवड जोपासली पाहिजेत असे ते म्हणाले
सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य श्री पा.म. अल्लापूरकर यांनी केले याप्रसंगी समाज सेवक व मान्यवर मंडळी उपस्थित होती.