अंबादास ओरसे च्या पाठीमागे मी पहाडासारखा उभा राहणार --- उत्तमराव जानकर
अकलूज (प्रतिनिधी):-
(बाळासाहेब गायकवाड)
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी अकलूजचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते व लोकनेते उत्तमराव जानकर व अशोकदादा गायकवाड व सुरेश आबा पालवे यांचे विश्वासू सहकारी अंबादास आण्णा ओरसे यांची सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांनी फेर निवडीचे पत्र स्वतःच्या हस्ते दिले असून त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चे (सामाजिक न्याय) उपाध्यक्ष अशोकदादा गायकवाड महाराष्ट्र सचिव तुकाराम साळुंखे युवानेते राहुल ढेरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
परंतु पक्ष श्रेष्ठी व राष्ट्रवादीचे सर्वे सर्व पवार साहेब विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार खासदार सुप्रिया सुळे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांना खरी वस्तूस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दिपक आबा साळुंखे लोकनेते उत्तमराव जानकर, सुरेश आबा यांचे,अशोकदादा गायकवाड यांनी समजावून सांगितले त्यामुळे अंबादास अण्णा ओरसे यांच्या फेर निवडीचे आदेश जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांना देण्यात आले निवडीचे पत्र घेतल्यानंतर लोकनेते उत्तमराव जानकर यांनी आपल्या गरुड बंगल्यात त्यांचा फेटा बांधून सत्कार केला त्यावेळी उत्तमराव जानकर म्हणाले की आंबादास अण्णा च्या पाठीशी सह्याद्री सारखा उभा राहिन असल्याचे त्यांनी सांगितले
त्यावेळी माळशिरस तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते वेळापूर येतील गरुड बंगल्यात उपस्थित होते तसेच अकलूज च्या राष्ट्रवादी काँग्रेस ने व अंबादास आण्णा यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले सत्काराला उत्तर देताना ओरसे यांनी लोकनेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली माज्यासहित तालुक्यातील राष्ट्रवादी च्या सर्वच कार्यकर्त्यांनी गट तट विसरून काम करण्याचे आव्हान केले.