समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना 13 वा राज्यस्तरीय पुरस्कार

समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना महाराष्ट्र समाजभूषण या पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले 
पंढरपूर --प्रतिनिधी 
पंढरपूर येथील समाजसेवक श्री मुजम्मील खलील कमलीवाले यांना त्यांच्या विशेष समाजकार्यातील योगदानासाठी राज्यातील मानाचा 13 वा राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
      पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवणारे समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांचे मोठे कार्य असुन नेहमीच चर्चेत असतात व त्यांनी अनाथ गरजु गरिबांसाठी मदत करताना दिसुन येतात त्यांच्या या कार्याची दखल ब्लु स्टार सामाजिक संस्था चे सचीव चंदन बनसोडे यांनी नियुक्ती केली.समाजातील विविध क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींना पुरस्कार सोहळा संपन्न झाला.हा कार्यक्रम विठ्ठल इन हाॅटेल मध्ये पार पाडला.
समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना महाराष्ट्र समाजभूषण या पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना शाल,हार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले हे नेहमीच जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन समाजसेवा करत असतात कोव्हीड काळात ही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.वाढदिवसाला अनावश्यक खर्च करण्याचे टाळुन तोच खर्च ते चांगल्या कामासाठी वापरतात.कोरोणा काळात कोरोणा योध्दा या पुरस्काराने त्यांना विविध संघटने कडुन पुरस्कार मिळालेले आहेत आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या समाजसेवकाची ब्लु स्टार संघटनेने हि दखल घेतली.
    
     समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी असे सांगीतले की मला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले मात्र हा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार देऊन जो सन्मान केला त्या सन्मानासाठी मी ऋणी आहे.मला माझ्या सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.माझे सामाजिक कार्य अखंडपणे सुरु राहील.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form