पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार

४ते जानेवारी ते ६ जानेवारी 2023 या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार -तहसिलदार
पंढरपूर --प्रतिनिधी 
पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडी ४, ते ६, जानेवारी रोजी होणार.पंढरपूर तालुक्यातील नुकत्याच 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होऊन दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सरपंच व सदस्य मतमोजणी प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी संबंधित ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाच्या निवडी होणार असून सदर सदस्यांना नोटीस तत्काळ देण्याच्या सूचनाचा ग्रामसेवक यांना देण्यात आले आहेत तसा आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिला आहे. त्यानुसार पंढरपूर येथील तहसीलदार यांनी संबंधित उपसरपंच पदाच्या सदस्यांना तत्काळ नोटीस काढण्याचा आदेश तहसीलदार सुशील बेलेकर यांनी प्रत्येक ग्रामपंचायतला दिला आहे. येत्या ४ते जानेवारी ते ६ जानेवारी 2023 या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत. 
सदर उपसरपंच पदाच्या निवडीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक ग्रामपंचायतीची नावे तसेच दिनांक पुढील प्रमाणे. महारुद्र नाळे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पंढरपूर, दिनांक ४/१/२०२३तुंगत ५/१/२०२३पुळुजवाडी,  अमृत
सरडे बाल विकास प्रकल्प दि. ४ जानेवारी खेड भोसे दिनांक ५ जानेवारी सुगाव खुर्द दिनांक ६ जानेवारी नेमतवाडी,  पि .के कोळी नायक तहसिलदार पंढरपूर दि४ जानेवारी मेंढापूर ५ जानेवारी खरातवाडी ६ जानेवारी बार्डी, श्रीमती शितल कन्हेरे पुरवठा निरीक्षक अधिकारी पंढरपूर दि. ४ जानेवारी अजोती. 5 जानेवारी व्हळे. दि. ६ जानेवारी टाकळी गुरसाळे एम बी शोत्री नायब तहसीलदार हे राखीव असून प्रत्येक ग्रामपंचायतिचे सरपंच या निवडीचे अध्यक्ष असणार आहेत . त्याचबरोबर नियुक्ती केलेल्या निवडणूक निरीक्षक यांच्यावर उपसरपंच पदाच्या निवडीची जबाबदारी देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form