वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ गठीत होण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम कृती आराखडा तयार करण्यात येणार तसेच वृत्तपत्र विक्रेते यांच्या विविध मागण्या बाबत चर्चा तसेच वृत्तपत्र वाचक वाढावा यासाठी वाचक चळवळ व्यापक स्वरूपात राबविणे अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली
पंढरपूर ---
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा अहमदनगर पुणे या जिल्ह्याचा समावेश असणार्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची पदाधिकार्यांची बैठक पंढरपूर येथे संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे सल्लागार शिवगोंडा खोत तर प्रमुख उपस्थिती राज्य संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांची होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे संघटन सचिव शाम थोरात, राज्य संघटनेचे कार्यकारणी सदस्य व माजी राज्य कोषाध्यक्ष गोरख भिलारे , राज्य कार्यकारिणी सदस्य अण्णा गुंडे , राजेंद्र माळी, सचिन चोपडे , गणेश पवार हे उपस्थित होते
याशिवाय माजी राज्य कार्यकारणी सदस्य मारुती नवलाई , जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुते , रवींद्र लाड, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवलिंग मेढेगार ,सचिन बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर, शिरोळ ,पंढरपूर सातारा ,बार्शी, सांगोला व आदींसह सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुका संघटनांचे पदाधिकारी मोठय़ संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत २६ व २७ जानेवारी रोजी बुलढाणा येथे होत असणार्या अधिवेशना संदर्भात माहिती देऊन चर्चा करण्यात आली. अधिवेशनामध्ये पश्चिम महाराष्ट्राची भूमिका काय मांडावी. पश्चिम महाराष्ट्रातील कोणते प्रश्न अधिवेशनात मांडले जावेत याबाबत चर्चा करण्यात आली. वाढीव कामिशन ,पुरवणी भरणावळ ,कल्याणकारी मंडळ, वाचक चळवळ आदी विषयांवर चर्चा केली.
त्यानंतर रघुनाथ कांबळे, गोरख भिलारे ,सचिन चोपडे, मारुती नवलाई यांनी मार्गदर्शन केले सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी बैठकीतील सर्व चर्चा व पुढील घडामोडी याबाबत आढावा घेत मार्गदर्शन केले बैठकीचे अध्यक्ष शिवगोंडांना खोत यांच्या मार्गदर्शनानंतर बैठकीचा समारोप झाला.
या बैठकीत पंढरपूर येथील वृत्तपत्र विक्रेते धनंजय जोशी यांनी वृत्तपत्र व्यवसायातून सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला तसेच मुकुंद हरिदास यांचा वाढदिवस निमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी बैठकीत पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी सुत्रसंचलन सिध्देश्वर सावंत यांनी केले तर बैठकीचे नियोजन नंदकुमार देशपांडे यांनी केले व आभार प्रदर्शन महेश पटवर्धन यांनी केले.
बैठकीतील ठराव......
वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ गठीत होण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम ठरवण्यात यावा.
कामिशन वाढीबाबत राज्यपातळीवर पाठुरावा करणे
वृत्तपत्र वाचक वाढावा यासाठी वाचक चळवळ व्यापक स्वरूपात राबविणे
ऑनलाईन अंक पाठवणे बंद करावे याबाबत राज्य संघटनेच्या अधिवेशनामध्ये कठोर भूमिका मांडणे