डॉ.काणे यांच्या गायत्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल व श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वांसाठी मोफत कॅन्सर रोग निदान शिबिर
पंढरपूर (प्रतिनिधी):
तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरांमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या डॉक्टर काणे यांच्या गायत्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल व श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वांसाठी मोफत कॅन्सर रोग निदान शिबिर त्याचबरोबर या शिबिरामध्ये पॅस्पमिअर टेस्ट मोफत केली जाणार असून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आपले लिंक असलेले आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक घेऊन आल्यास त्यांना आयुष्यमान भारत कार्डही मोफत काढून मिळणार आहे अशी माहिती डॉ. वर्षा काणे व डॉ.सुरेंद्र काणे यांनी दिली.
या शिबिरात पॅस्पमिअर टेस्ट फ्री व आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून मिळणार.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना भारत विकास परिषद डॉक्टर काणे मेडिकल असोसिएशन पंढरपूर व सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर यांच्या विद्यमाने मोफत मार्गदर्शन तसेच कॅन्सर रोग निदान शिबिर आयोजित केले आहे याचा शहर व तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन या ठिकाणी होणारे मोफत कॅन्सर रोग निदान शिबिरात आपली तपासणी करून घ्यावी व कॅन्सर पासून कशा पद्धतीने बचाव करता येतो याचे मोलाचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन डॉ.काणे यांनी केले .
सदरचे शिबिर हे नवीन करार नाका कराड रोड येथील डॉ. कांणे गायत्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे आयोजित केले असून सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या शिबिरामध्ये रोग निदान केले जाणार आहे.
सदर माहिती देताना काणे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे स्टाफ व त्यांचे सहकारी उपस्थित होते.