राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये सामाजिक बांधिलकी,नेतृत्व गुण, एकूणच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असतो--प्रणव परिचारक
गादेगाव ---प्रतिनिधी
पंढरपूर येथील उमा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन 2जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत गादेगाव, ता. पंढरपूर येथे केले आहे.या शिबिरासाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराचे उद्घाटन गादेगाव येथे 2 जानेवारी रोजी संस्थेचे विश्वस्त माननीय युवा नेते प्रणवजी परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ वंदनाताई मोहन बागल या होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी मा.प्रणवजी परिचारक यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये सामाजिक बांधिलकी,नेतृत्व गुण, एकूणच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन केले.उपसरपंच गणपत शिवाजी मोरे यांनी उपस्थितांना त्यांच्या व्यक्तिमत्व घडणीत उमा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे योगदान असल्याचे स्पष्ट केले.याबरोबरच मा.रंजीतभैया बागल यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे ग्रामविकासात कशाप्रकारे योगदान लाभते याविषयी विवेचन केले.प्र.प्राचार्य डॉ. धीरज कुमार बाड यांनी आपल्या मनोगतातून विशेष श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.सर्वगोड एन सी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कावरे व्ही एन यांनी केले.आभार प्रा.अविनाश देशपांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. शिंदे एस. के ,प्रा. बनकर ए. डी ,प्रा दाभोळकर व्ही एस प्रा.होनमाने व्ही आर, प्रा. हजारे एस डी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी गादेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य ,पदाधिकारी समस्त ग्रामस्थ, महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.