पंढरपूर शहर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुरज सरवदे तर कार्याध्यक्षपदी संतोष रणदिवे

६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
पंढरपूर- प्रतिनिधी 
पंढरपूर शहर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सह्याद्री न्यूज चे संपादक सुरज सरवदे तर कार्याध्यक्षपदी दैनिक तरुण भारत संवादचे संतोष रणदिवे यांची निवड एकमताने करण्यात आली.
     पत्रकार भवन येथे ज्येष्ठ पत्रकार सुनील दिवाण व प्रशांत आराध्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, यावेळी जेष्ठ पत्रकार अभय जोशी, अतुल बडवे, सचिन कसबे, संकेत कुलकर्णी, दत्तात्रय खटवटे, मंदार लोहोकरे, महेश खिस्ते ,संतोष कुलकर्णी, नागनाथ सुतार, नितीन शिंदे, दत्तात्रय देशमुख, श्याम दिवेकर आधी उपस्थित होते.
 ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमास मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व सहाय्यक जिल्हा अधिकारी तुषार ठोंबरे ज्येष्ठ पत्रकार
विलास उत्पात, सिद्धार्थ ढवळे, उपस्थित राहणार असल्याचे माहिती संकेत कुलकर्णी यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form