समाज उन्नतीसाठी एकत्रित आलेल्या झेप परिवाराच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
मंगळवेढा-(प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'झेप' सन्मान सोहळ्यात गौरवण्यात येते. यावर्षीचे 'झेप' सन्मान सोहळा 2023 मध्ये सन्मानित होणाऱ्या मान्यवरांच्या नावाची घोषणा 'झेप'चे परिवाराच्या वतीने 'झेप' सन्मान सोहळ्याचे समन्वयक प्रा. बसवराज पाटील यांनी केली. पुरस्कार पुढीलप्रमाणे :- १) झेप आदर्श संस्था पुरस्कार - मराठी साहित्य परिषद पुणे, शाखा दामाजी नगर मंगळवेढा. २) धन्वंतरी पुरस्कार - आरोग्यवर्धिनी केंद्र मरवडे (सोलापूर जिल्ह्यात एक अग्रेसर प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून नावलौकिक) ३) हिरकणी पुरस्कार- कमल उर्फ सूनंदा कुंडलिक खांडेकर बावची (श्रीकांत खांडेकर आयएएस अधिकारी यांच्या मातोश्री ) ४) आदर्श पत्रकारिता पुरस्कार- संभाजी शिवाजी नागणे (जेष्ठ पत्रकार मंगळवेढा पत्रकार संघ) ५) आदर्श शाळा पुरस्कार - नूतन हायस्कूल बोराळे, ६) सेवावृत्ती पुरस्कार- नारायण हनमंत माने (सेवानिवृत्त सहाय्यक लेखापाल, दामाजी शुगर, विविध क्षेत्रात समाज उपयोगी काम ) ७) स्वामी विवेकानंद आदर्श शिक्षक पुरस्कार- विशाल विलास गायकवाड, (प्राथमिक विभाग सहशिक्षक नगरपालिका शाळा नंबर 5 मंगळवेढा) ८) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार - सौ. इंदिरा विठ्ठल थोरात चौधरी (माध्यमिक विभाग, सहशिक्षिका शरद पवार विद्यालय शरद नगर मल्लेवाडी) ९) झेप उत्कृष्ट निवेदक पुरस्कार - दिलीप एकनाथ बिनवडे (ब्रह्मपुरी निवेदन क्षेत्रात गेल्या 40 वर्षापासून कामाचा ठसा) १०) गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार- सुखदेव हरिबा पवार (सेवक, माध्यमिक आश्रम प्रशाला व ज्युनिअर कॉलेज बालाजी नगर ) या व्यक्ती व संस्थांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१ जानेवारी २०१९ पासून समाज उन्नतीसाठी एकत्रित आलेल्या झेप परिवाराच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्याबाबतचे 'झेप' परिवाराचे मार्गदर्शक भारत घुले, प्रा. शिवलाल जाधव, उत्तम सिंग रजपूत, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मेलगे, सचिव प्रा. मल्लेशा अरेकरी, प्रा. संतोष आसबे, प्रा. अनुजा चौगुले, अश्विनी मेलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुरस्कार प्राप्ती व्यक्ती व संस्थांना याच महिन्यात होणाऱ्या 'झेप' सन्मान सोहळा 2023 मध्ये सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा व एक पुस्तक तसेच रोपटे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.