करकंब येथील चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टकडून महिलांना विविध कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ
करकंब येथील श्री . चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब .यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या विविध स्पर्धांचा शुभारंभ मोठ्या दिमाखात संपन्न होत असताना गेली २१वर्ष महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी अखंड हे ट्रस्ट प्रेरणा आणि उर्जा देण्याच काम करीत असतानाच काल विविध वेशभूषा स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये एका दारुड्या ची सुंदर भुमिका साकारत असताना दारुमुळे आपल्या संसाराचे किती वाटोळे होते त्याचे समाजामध्ये किती दुष्परिणाम होतात त्याचे सामाजिक प्रबोधन महिलांनी अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण केले., त्यामुळे कोणी व्यसन करु नका .हा महत्त्वाचा संदेश मंगलकाकू रसाळ यांनी अतिशय सुंदर रितीने सादर केला. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांची भुमिका प्रियांका टकले,सिंधूताई सपकाळ यांची भूमिका वैशाली टकले यांनी अप्रतिम साकारली, त्या मध्ये सिंधूताई सपकाळ यांनी जीवनात झालेला त्रास आणि व्यथा कशा सहनकरून अनाथ लेकरांची आई बनली अतिशय सुंदर भुमिका साकारत वाहवा मिळवली,नारदीय कीर्तनकार वारकरी यांची भुमिका वृषाली बोधे,नंदाकाकू फासे,ज्योती इदाते यांनी सुंदर केली,त्यानंतर सुजाता महामुनी यांनी भारतीय वेशभूषा किती सर्वगुणसंपन्न असून याचा वापर सर्व तरुणींनी करावा. परदेशी संस्कृतीला मुठमाती देऊन भारतीय पेहराव परिधान करावा असे सांगितले,त्यानंतर सुचिता वास्ते वहिनी आणि आकांक्षा मस्के वहिनी यांनी डॉक्टर हा व्यवसाय नसून एक सेवा भावनेतून गोरगरीब पेशंटची सेवा करण्याचा सल्ला या मनोगतातून दिला,तसेच महिलांनी आपले आरोग्य कसे चांगले राहील याकड लक्ष दिलं पाहिजे आपल शरीर हिच खरी संपत्ती आहे.ती जपली पाहिजे. असा बहुमोल सल्ला या माध्यमातून दिला,यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या भुमिकेत प्रियांका टकले आणि सुजाता भंडारे यांनी लोकांनी कितीतरी त्रास दिला तरी मी मुलींना शिकवणार अशी प्रतिज्ञा करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची सुंदर भुमिका सादर केली,यानंतर वास्ते वहिनी यांनी शिक्षिकेची भुमिका करत मुलांचं शिक्षण किती महत्वाच आहे याकडे लक्ष देण्याच काम शिक्षकां बरोबर पालकांचही आहे यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे तरच आपला पाल्य स्वतःच्या पायावर उभा राहुन शकेल असे सांगितले,सौ.पिसे वहिनींनी कपड्यावर वस्तू घे ग माय वाड ग माय सुंदर भुमिका सर्व महिलांचं लक्ष वेधून घेत असतानाच स्वतः आपल्या मुलांचा सांभाळ स्वतः कष्ट करुन कशी जीवन जगतात याच उदाहरण या भुमिकेतून सांगण्यात आले,जागर टीमच्या संकल्पक अंजली टकले यांनी गाडगेबाबांची भुमिका साकारत त्यांची दशसुत्री सांगत स्वच्छतेच महत्व पटवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट करत कीर्तनातून जनजागृती करत गाव स्वच्छ करत याविषयी माहिती देऊन करकंब गावही जागर टीमच्या माध्यमातून स्वच्छ करतोय सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले,त्यानंतर दिपाली म्हेत्रे यांनी सुंदर भुमिका साकारत दीड तास सुरू असलेल्या या स्पर्धेस परीक्षक म्हणून पंढरपूर येथील कलासाधना मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत बडवे व लेकीच झाड अभियान टीमचे सदस्य नंदलाल कपडेकर यांनी काम पाहिले..पुढील दिवसांत होऊ द्या धिंगाणा,रांगोळी स्पर्धा,झटपट स्पर्धा, पाककला स्पर्धा याही स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळणार यात शंका नाही ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतिशय सुंदर आयोजन विजय भागवत ज्ञानेश्वर दुधाणे आणि सर्व महिलांनी सुंदररित्या पार पाडले, यासाठी अध्यक्ष मिलिंद उकरंडे संतोष बुगड संतोष पिंपळे, संजीवकुमार म्हेत्रे,नारायण वास्ते,प्रभाकर टेके, राजेंद्र टकले,यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर नियोजन होतं आहे.