गेल्या १८ वर्षापासून दरवर्षी ३१ डिसेंबर या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन,
१७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
पंढरपूर --प्रतिनिधी
पंढरपूर येथील एनआयटी कॉम्प्युटर व नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर मित्र परिवाराच्या वतीने मागील 18 वर्षापासून दरवर्षी 31 डिसेंबर या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यंदाही नेत्र तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन पंढरपूर येथील जाधव जेठाबाई मठ स्टेशन रोड येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे मा.आ. प्रशांतरावजी परिचारक भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले मनसेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप बापू धोत्रे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ भादुले अमर सूर्यवंशी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले तसेच हायकोर्टाचे ज्येष्ठविधीज्ञ सारंगा आराध्ये पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक नवनाथ रानगट ,विवेक परदेशी, सचिन कुलकर्णी, नूतन अर्बन बँकेचे संचालक गणेश शिंगण व अमित मांगले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच पंढरपुरातील प्रतिष्ठित नागरिक,राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक व पत्रकारिता करणारे सर्व प्रतिनिधी मान्यवर मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होते
३१ डिसेंबर रोजी विविध मित्र मंडळाचा वेगवेगळे उपक्रम असतात आजकालची तरुण पिढी व्यसनाधींच्या आहारी जात असताना हा ३१डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम जाणीवपूर्वक आयोजित केला जातो कारण रक्तदान करणारा कुठलाही तरुण अथवा रक्तदाता हा पुढील ४८ तास कोणतेही व्यसन करू शकत नाही अशा या विधायक गोष्टीसाठी पंढरपुरातील बरेच तरुण आवर्जून उपस्थित राहतात आणि हा आगळावेगळा उपक्रम यामध्ये सहभागी होऊन सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करीत असतात या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रशांत परिचारक म्हणाले की हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलाअसून रक्तदानाचे महत्व याबाबत ते बोलले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
यावेळेस मंदार केसकर, प्रताप चव्हाण, दत्तात्रय धोत्रे ,संतोष जाधव , पवन कुमार झुंबर, श्याम बाहेती, गोपाळशेठ भुतडा, अमोल आटकळे, प्रशांत झिंजुर्डे, राजाभाऊ खोबरे ,नागेश कदम, संतोष शिरगिरे, राजाभाऊ उराडे, सचिन कदम, अशोक भुसे, संतोष गंगथडे, इंद्रजीत परिचारक ,परमेश्वर कोळेकर ,काशिनाथ गोगाव, महेश भोसले, अश्फाक मुजावर, देसाई सर ,संतोष कवडे आदी मान्यवर उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश जाधव ,ईश्वर शिंदे, गणेश पिंपळनेरकर, महेंद्र जोशी, समरण ताठे देशमुख, दत्तात्रय पवार ,सत्यवान दहिवडकर ,विजय वाघ, सुरज खटावकर, बाहुबली गांधी, महेश मेत्रे ,शितल खबानी, हेमंत कांबळे, पंकज देवकते, हेमंत कुलकर्णी, विजू घुले, राजेश विभुते, राजेंद्र भोसले , नितीन आसबे, अमित घाडगे , आदी सहकारी मित्र मंडळाने सहकार्य केले