काँग्रेसने दिलेली निष्ठेची पोहोचपावतीच आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा काँग्रेसचे सहसचिव , सचिव आदी पदे भूषवली असून काँग्रेसने आता तालुक्याची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली आहे.
पंढरपूर (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारणीमध्ये मोठे बदल करण्यात आले असून, पंढरपूर तालुका अध्यक्षपदी हनुमंत मोरे यांची निवड करण्यात आली आहे. मोरे हे भोसे गावचे रहिवासी असून, अनेक वर्षापासून पक्षाचे काम करीत आहेत. हनुमंत मोरे यांच्या या निवडीमुळे, जनसामान्यांसह मध्यमवर्गीय समाजाकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुका अध्यक्षांच्या नूतन निवडी प्रदेश पातळीवर जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडींबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह येथे पाटील यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे हे पत्र ३० डिसेंबर रोजी प्राप्त झाले असून, प्रथमच सर्वसामान्य समाजास, हनुमंत मोरे यांच्या रूपाने न्याय मिळाला आहे.हनुमंत भगवान मोरे हे कल्याणराव काळे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. कल्याणराव काळे काँग्रेसमध्ये असताना त्यांची नाळ माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी जुळली. तेव्हापासून त्यांनी काँग्रेसचे काम पूर्ण निष्ठेने केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अकोला दौऱ्यातही ते सामील झाले होते. त्यांची तालुका अध्यक्ष पदावर निवड होणे, ही त्यांना काँग्रेसने दिलेली निष्ठेची पोहोचपावतीच आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा काँग्रेसचे सहसचिव , सचिव आदी पदे भूषवली असून , काँग्रेसने आता तालुक्याची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, यांच्यावर श्रद्धा ठेवून पुढील काळात काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचवण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया हनुमंत मोरे यांनी दिली आहे.