आयुष्यात पुढे जायचे असेल तर ध्येय व उद्दिष्ट स्थिर असावे- सुरेश पवार

पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये "यश आपल्या हाती" याविषयावर सुरेश पवार यांचे व्याख्यान 
पंढरपूर: प्रतिनिधी
समाजासाठी काय तरी धडपड करायचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या परीसरात उपलब्ध होणारी नोकरी स्विकारून जीवनची सुरवात केली. आयुष्यात जबाबदारी समर्थपणे स्विकारता आली पाहिजे. आयुष्याच्या यशस्वी टप्प्यात शिक्षण घेत असताना काय व्हायचे आहे हे ठरविणे आवश्यक आहे. यश मिळवायचे असेल तर ध्येय निश्चित केले पाहिजे. यश मिळवायचे असेल तर मन स्थिर असायला पाहिजे. दुर्गम इच्छाशक्ती जीवनात तुमच्याकडे असली तर अशक्य काहीच नाही. एखादी गोष्ठी मनापासून केली तर ती साध्य होते. आयुष्यात आलेले अपयश पचवता आले पाहिजे. प्रचंड मेहनत व अभ्यासात सातत्य ठेवले तर तुम्ही यशाचे शिखर पादाक्रांत करू शकतात. जे कराचे आहे ते साध्य करण्याची तुमची इच्छाशक्ती प्रचंड ठेवा यश आपोआप मिळेल.
आयुष्यात पुढे जायचे असेल तर ध्येय व उद्दिष्ट स्थिर असावे असे मत सुरेश पवार यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.
  रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय कोर्टी (ता.पंढरपूर) यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी "यश आपल्या हाती" या विषयावर सुरेश पवार यांचे व्याख्यान
आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात व्याख्याते सुरेश पवार, प्राचार्य  डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
   
     व्याख्याते सुरेश पवार यांचे महाविद्यालयाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी व्याख्याते सुरेश पवार यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form