मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी आणि राहटेवाडी या दोन गावातून सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी हे मंगळवेढ्यापासून चार किलोमीटर अंतरावर असून तेथे फक्त साडेसातशे मताचे गाव आहे. हे गाव छोटसं आणि समजूतदार असून राजकीय विचाराची चर्चा नेहमीच या गावात रंगत असते. कारण तालुका पार्टीचे विश्वस्त या गावातून तयार झालेले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील अठरा गावाची ग्रामपंचायत निवडणुका लागलेल्या असून लोकनियुक्त सरपंच निवडीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे. काल दिनांक ७ डिसेंबरला तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी आणि राहटेवाडी या दोन गावातून सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. फटेवाडी येथून सौ सीमा प्रकाश काळुंगे व सात सदस्य आणि राहटेवाडी येथून श्री दत्तात्रय दसाडे व सात सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. या दोन्ही गावांनी बिनविरोधाची परंपरा कायम ठेवून अशा धकाधकीच्या काळात युवा पिढीला सावरात एक आदर्श निर्माण केलेला आहे.
फटेवाडीच्या ग्रामस्थांनी तर श्री प्रकाश काळुंगे यांचा वाढदिवस होता. त्याचे अवचित्त गाठून त्यांच्या सौभाग्यवती सीमा काळुंगे यांना बिनविरोध सरपंच पद देऊन दोघा उभयंतांना गावच्या विकासासाठी त्यांच्या गळ्यात माळा घातल्या याची सर्वत्र चर्चा चालू आहे.