वारकरी श्रीमती लक्ष्मीबाई पापळ , पुणे यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार
पंढरपूर --प्रतिनिधी
रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ मार्गशिर्ष शु. ३ संकष्ठी चतुर्थी रोजी श्रीमती लक्ष्मीबाई गोविंदराव पापळ राहणार प्लॉट नं १५२, बिबेवाडी गावठाण, पुणे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस रक्कम रू २,००,०००/- अक्षरी दोन लाख रूपये रोख देणगी दिली त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती च्या वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रीमती लक्ष्मीबाई गोविंदराव पापळ यांचा सत्कार "श्री" ची प्रतिमा, उपरणे, श्रीफळ देऊन करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.