लक्ष्मी टाकळी, तालुका पंढरपूर येथे ग्राहक प्रबोधन मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता
पंढरपूर --प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,सोलापूरच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी लक्ष्मी टाकळी, तालुका पंढरपूर येथे ग्राहक प्रबोधन मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी लक्ष्मी टाकळीच्या सरपंच विजयमाला वाळके, उपसरपंच संजय साठे, तसेच प्रभाग क्रमांक चार चे ग्रामपंचायत सदस्य भैय्यासाहेब सोनवणे,सौ रेश्मा साठे, सौ कारंडे, सौ साठे तसेच माजी सरपंच नूतन रसाळे आणि प्रसिद्ध उद्योजक श्री महेशनाना साठे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. जिल्हा कार्यकारणी सदस्य आण्णा ऐतवाडकर यांनी सर्वांचे स्वागत केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत हरिदास यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना व ग्राहक चळवळीचेमध्ये योगदान स्पष्ट केले. तसेच ग्राहक पंधरवड्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच स्वानंद कला मंचचे मार्गदर्शक श्री दिलीप टोमके तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 ची सविस्तर माहिती दिली व ग्राहकांच्या अधिकाराबद्दल जागरूकता निर्माण केली. तसेच प्रशासनस्तरावर ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. ज्येष्ठ नागरिकांच्या सोईसाठी कामकाजाचे दिवस राखून ठेवण्यात यावेत अशी मागणी केली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वारंवार ऑफिसच्या चक्र माराव्या लागणार नाहीत असे स्पष्ट केले.
याप्रसंगी बोलताना सरपंच विजयमाला वाळके यांनी ग्राहक पंचायतीच्या सूचना अंमलबजावणी करण्यात येईल अशी आश्वासन दिले. उपसरपंच संजय साठे यांनी मासिक सभेमध्ये ठराव घेऊन ज्येष्ठ नागरिकांना सोयी उपलब्ध करून देण्यात येतील अशी आश्वासन दिले.
याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध उद्योजक महेशनाना साठे यांनी राज्य सरकारशी समन्वय साधून लक्ष्मी टाकळीच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे जाहीर केले. याप्रसंगी बोलताना प्रांत सहकोषाध्यक्ष विनोद भरते यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने नागरिकांच्या हितासाठी शासन दरबारी केलेला पाठपुरावा व त्यामध्ये आलेली यश प्रतिपादन केले. तसेच सर्वांनी ग्राहक चळवळीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. जिल्हा सचिव सुहास निकते यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका संघटक महेश भोसले, तालुका सचिव धनंजय पंधे, कार्यकारणी सदस्य संजय खंडेलवाल, मकरंद पदमवार, तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,जिल्हा कार्यकारणी सदस्य पांडुरंग अल्लापुरकर,सुनील यरगट्टीकर,पांडुरंग इरकल, अर्जुन इरकल, सत्तारभाई तांबोळी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज मुलाणी यांनी केले. या कार्यक्रमासाठी लक्ष्मी टाकळी मधील जेष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.