सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालयात तीन दिवसीय चित्रकला कार्यशाळा संपन्न

विद्यार्थ्यांना चित्रकला,कलाइतिहास,
शिल्पकला, तसेच रिलीफ याचं संपूर्ण ज्ञान व्हावं  विद्यार्थी कलाक्षेत्रात सक्षम असावा या उदात्ते हेतूने तिन दिवसीय कार्यशाळा भरण्यात आली होती.

पंढरपूर --प्रतिनिधी
पंढरपूर येथील अष्टविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालयांमध्ये संस्थेचे संस्थापक श्री भारत माळी सर यांच्या जन्मदिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये नामांकित कलाकारांचे प्रात्यक्षिक दिनांक २३ डिसेंबर  ते २५डिसेंबर २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत नामांकित असे कलाकार आले होते.
आपल्या चित्रकला महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांना चित्रकला,कलाइतिहास,
शिल्पकला, तसेच रिलीफ याचं संपूर्ण ज्ञान व्हावं आणि त्यांच्या शैक्षणिक जीवनात प्रगती करावी. आणि आपल्या विद्यार्थी दशेत ज्ञानात मोठ्या प्रमाणात भर पडावी . माझा विद्यार्थी कलाक्षेत्रात सक्षम असावा या उदात्तेतूने या महाविद्यालयातील संस्थापक यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा भरण्यात आली होती.या तीन दिवसीय कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक कलाप्रेमी व्यक्तींनी सहभाग घेतला होता 
   सदर प्रात्यक्षिकामध्ये दि. २३डिसेंबर रोजी प्रसिद्ध चित्रकार श्री अभिषेक आचार्य यांचा व्यक्ती चित्र या विषयावर प्रात्यक्षिक करून  त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दि.२४ रोजी प्रसिद्ध शिल्पकार  नितेश परीट यांचे व्यक्ति शिल्पाचे प्रात्यक्षिक करून दाखविले .या युवा शिल्पकारांनी उपस्थितांचे मन जिंकले. तसेच दिनांक २५ डिसेंबर रोजी  मुकेश जी पूरो सर प्राचार्य मुंबई कला महाविद्यालय गिरगाव यांचे व  दीपक कदम सर यांचे रिलीफ चे प्रात्यक्षिके त्यांनी सादर केली व कला इतिहास व संस्कृती या विषयावर मार्गदर्शन केले.
 सदर तिन दिवसांच्या या कार्यशाळेची सुरुवात संस्थेचे संस्थापक  भारत माळी सर यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने सत्काराने करून सुरू करण्यात आला होता.  अतिशय सुंदर अशा कार्यक्रमांचे नियोजन संस्थेतील प्रत्येकाने केले होते   सर्व कलाकारांचे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने  विशेष सन्मान करण्यात आला होता. 
  यावेळी संस्थेचे अध्यक्ष  भारत माळी सर महाविद्यालयाचे प्राचार्य  सचिन देशपांडे सर प्राध्यापक सचिन घंटे सर हनुमंत माळी सर तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form