महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी नागेश अदापुरे यांची तर तालुका अध्यक्षपदी मनोज पवार यांची निवड

मराठी पत्रकार संघ मुंबई पश्चिम विभाग उपाध्यक्ष-राजेंद्र कोरके -पाटील ,मार्गदर्शक - राधेश बादले -पाटील,शंकर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड झाली 
पंढरपूर (प्रतिनिधी) :-
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ;मुंबई. अंतर्गत पंढरपूर तालुका कार्यकारणी बैठक स्टेशन रोड, जैतूंबी महाराज मठ या ठिकाणी  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्र कोरके -पाटील प्रवीण नागणे, शंकर कदम, सुरेश गायकवाड, विवेक बेणारे, राजकुमार घाडगे, रवींद्र कोळी, यांचे मार्गदर्शनाखाली संघाचे मार्गदर्शक राधेश बादले- पाटील. यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
             यावेळी सन-2023-24 च्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पंढरपूर शहराध्यक्षपदी साप्ताहिक अनंत विचारचे संपादक नागेश आदापुरे व तालुकाध्यक्षपदी-मनोज पवार यांची निवड करण्यात आली. तसेच या बैठकीमध्ये पंढरपूर व तालुका
          कार्यकारणीच्या बैठकीमध्ये तालुका उपाध्यक्ष-रामदास नागटिळक , कार्याध्यक्ष-ऋषिकेश वाघमारे, प्रसिद्धीप्रमुख-गोपीनाथ देशमुख, सचिव -राजेंद्र करपे, खजिनदार- सुनील कोरके( भोसे), सह -खजिनदार -संजय रणदिवे (तुंगत), तालुका संघटक-लक्ष्मण शिंदे आदि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
 तर शहर कार्याध्यक्षपदी सचिन कुलकर्णी उपाध्यक्ष पदी विनोद पोतदार सचिव पदी कुमार कोरे खजिनदार विक्रम कदम प्रसिद्धी प्रमुख दादा कदम शहर संघटक संजय यादव यांची निवड करण्यात आली.
       यावेळी या बैठकीवेळी संघाचे -विनोद पोतदार. यांनी बैठकीचा सर्व इतिवृत्तान्त वाचून दाखविला. सदर बैठकीमध्ये प्रवीण नागणे.( सर )यांनी या पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या वर्षी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन व पुढील वर्षी नूतन पदाधिकाऱ्याकडून करणाऱ्या योगदानाच्याबाबत मार्गदर्शन करून अभिनंदन चा ठराव मंजूर करण्यात आला. 
         नूतन तालुकाध्यक्ष,शहर अध्यक्ष व  सर्व मार्गदर्शक ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री. विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून नूतन पदाधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
    या बैठकीमध्ये संघाचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई पश्चिम विभाग उपाध्यक्ष-राजेंद्र कोरके -पाटील, तालुका अध्यक्ष प्रवीण नागणे मार्गदर्शक - राधेश बादले -पाटील.  शंकर नाना कदम., कुमार कोरे.यांनीही मोलाचे मार्गदर्शन करून नूतन पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
       या बैठकीस अतुल अभंगराव (सर), विश्वनाथ केमकर.(सर) , डॉ. नितीन खाडे, रोहन नरसाळे, राजकुमार घाडगे, सुरेश गायकवाड, रवींद्र कोळी आदिसह पंढरपूर तालुका व पंढरपूर शहर मधील ज्येष्ठ पदाधिकारी , मार्गदर्शक व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form