प्रामाणिक कार्याबद्दल श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सहाय्यक फौजदार श्री विठ्ठल यवाप्पा शिंदे यांचा सत्कार
पंढरपूर --
गुरुवार दिनांक २९/१२/२०२२ रोजी सायंकाळी ६.०० वा च्या दरम्यान श्री संत तुकाराम भवन च्या परिसरात एका श्री विठ्ठल भक्ताची ५ ग्राम ७०० मिली वजनाची सोन्याची चैन सापडली. त्या वेळेस तेथे कर्तव्यावर हजर असणारे मंदिर सुरक्षा सहाय्यक फौजदार श्री विठ्ठल यल्लप्पा शिंदे यांनी ती पाहिली, व तात्काळ श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे माहिती केंद्र येथे माहीती देऊन तात्काळ स्पिकरवरून सदर गहाळ सोने चैन सापडली आहे ओळख पटवून ती घेऊन जाण्याची सुचना देण्यात आली.
परंतु आजदि.३०/१२/२०२२ सायं ५.०० वा पर्यंत कोणीही भाविक आले नसलेने ती सोने चैन आज श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती कार्यालयात जमा केली. त्यांच्या प्रामाणिक कार्याबद्दल श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सहाय्यक फौजदार श्री विठ्ठल यवाप्पा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.