तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जळोली शाळेचा प्रथम क्रमांक

जिल्हा परिषद प्राथमिक जळोली शाळेने मुलींच्या लंगडी स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली
पंढरपूर ---प्रतिनिधी
पंढरपूर            राहुल गांधी माध्यमिक विद्यालय कोर्टी या ठिकाणी संपन्न झाल्या. लहान गटाच्या या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक जळोली शाळेने मुलींच्या लंगडी स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. शाळेतील पदवीधर शिक्षक श्री जयवंत कापसे सर, संतोष कापसे सर, सोमनाथ पवार सर, रमेश खारे सर, शिवाजी गोरे सर, राहुल पटवेकर सर व मुख्याध्यापक श्री गणपत मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक पटकावल्या नंतर सर्व विद्यार्थीनी व शिक्षक यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला 
  याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. महारुद्र नाळेसाहेब, विस्तार अधिकारी लिगाडे साहेब यांनी विजेत्या टीमचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच याबद्दल केंद्र प्रमुख पांडुरंग जाधव सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश भाऊ नरसाळे उपाध्यक्ष संतोष जाधव आणि जळोली चे सरपंच श्री जोतीराम मदने उपसरपंच मनोज नरसाळे  व जळोली ग्रामस्थ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form