तेज न्यूजच्या माध्यमातून होणाऱ्या चांगल्या कार्याचे दखल जनसामान्यांनी घेतली --कल्याणराव काळे.
भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील तेज न्यूज चैनल च्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 28/ 12 /2022 रोजी संध्याकाळी 5=30 वाजता शाकंभरी देवी मंदिरातील पटांगणात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक इस्माईल इनामदार हे होते. तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे संचालक कल्याणराव काळे ,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे , पश्चिम महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सांगोला विधान सभा मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वतीने दिग्विजय पाटील यांनी सन्मान पत्र व सत्कार स्वीकारला.यावेळी आ.शहाजी बापू पाटील, ई. बा. मुलाणी,रामचंद्र सरवदे, भाळवणी गावचे सरपंच राजकुमार पाटील, केसकरवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक संजय राजे मासाळ तसेच पळशी येथील पोलीस पाटील प्राध्यापक अशोक लोखंडे या राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, सहकार,पत्रकारिता या क्षेत्रात उलेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दिलीप भानवसे,शहाजी साळुंखे, दिपक गवळी,विजय शिंदे,अर्जुन लिंगे,प्रवीण शिंदे,सुनील पाटील,काका म्हेत्रे,अर्जुन जाधव,राजाराम पाटील,दाऊद शेख, हणमंत जमदाडे,रणजीत जाधव,पोपट इंगोले,मनोज डंबाळ, धनंजय धोत्रे, भिमराव जाधव सर, सतीश साळवे, निहाल शेख,सचिन कुचेकर, धोंडिराम शिंदे, पिंटू निराळी, मुन्ना इनामदार,दत्ता गोफणे, विठ्ठल मासाळ,आत्माराम गाढवे,नाना केसकर,रामचंद्र केसकर,लक्ष्मण केसकर,विष्णू मासाळ,राजकुमार मासाळ,दत्ता मासाळ,महेश शिंदे,विठ्ठल लिंगे,ओम लिंगे,पत्रकार सुरक्षा समितीचे रवींद्र शेवडे, दत्ताजी पाटील,दिनेश खंडेलवार, रफिक आत्तार, चैतन्य उत्पात, अमोल गुरव,रामकृष्ण बिडकर,प्रवीण शहा,विजयकुमार मोटे,अक्षय जाधव, पवन बोधे, प्राची माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी ई. बा.मुलाणी म्हणाले,की भाळवणी व परिसरातील सर्व माहिती तेज न्यूज चॅनल मधून वाचण्यास मिळते.बातमीत खरी बाजू मांडली जाते.त्यामुळे काही वाचकांना त्रास होतो.पण त्यातून खरेपणा समजतो.
यावेळी कल्याणराव काळे म्हणाले, तेज न्यूजच्या माध्यमातून चांगलेच सामाजिक कार्य केले जात आहे. तेज न्यूज मुळे आपणास आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना समजतात. इतरा पेक्षा वेगळे पोर्टल आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात भाळवणी व भाळवणी जिल्हा परिषद गटातील कोरोना रुग्णांची माहिती सर्वप्रथम या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आली. या चॅनलच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा.
संभाजी शिंदे म्हणाले , तेज न्यूजच्या माध्यमातून मान्यवरांचा सत्कार करताना माझ्या नावाचा उल्लेख केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. कोरोना काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून मेंढापूर येथील असलेल्या गाई,हरीण या प्राण्यांना चारा उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर सांगली मिरज येथील महापुरात समितीतर्फे लाखो रुपये मदत केली. आपल्या परिसरात कोरोना काळात आर्सेनिक अल्बम गोळ्या, धान्य किटचे मोफत वाटप केले.
रामचंद्र सरवदे म्हणाले, नावा प्रमाणेच तेज असलेले हे चॅनल आहे . सर्वात अगोदर बातमी देण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो या परिवारास माझ्या व पत्रकार सुरक्षा समिती कडून शुभेच्छा.या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ चि.ओंकार माळवदे व मान्यवर यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत नितीन शिंदे यांनी केले.प्रास्ताविक प्रशांत माळवदे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.सविता ताकभाते व साक्षी माळवदे यांनी केले.तर आभार आनंद देशपांडे यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.