अतिशय बिकट परिस्थिती मधून जिद्दीने आणि कष्ठाने प्रथमेश आणि तुषार यांनी यश मिळवले,एखादी वेगळी वाट निवडणाराच यशस्वी होतो हे या दोघांनीही सिद्ध करून दाखवले...
शेळवे :(संभाजी वाघुले )
पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथील चि.प्रथमेश लक्ष्मण पवार यांची भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) याठिकाणी व शेळवे येथील चि.तुषार प्रकाश लोकरे यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) येथे सार्थ निवड झालेबद्दल सनराईज पब्लिक स्कूल शेळवे च्या वतीने सन्मान करण्यात आला, प्रसंगी शेळवे गावचे उपसरपंच किरण दादा गाजरे, ग्रामपंचायत सदस्य डॉ.शशिकांत नागटिळक,खेड भाळवणीचे प्रगतशील बागायतदार,युवा नेतृत्व शहाजी पाटील,सनराईज मिडिया चे समाधानभैय्या गाजरे,सुनिल साळुंखे,अजिनाथ साळुंखे उपस्थित होते..
अतिशय बिकट परिस्थिती मधून जिद्दीने आणि कष्ठाने प्रथमेश आणि तुषार यांनी यश मिळवले,साधारणपणे वैद्यकीय, माहिती व तंत्रज्ञान,अभियांत्रिकी व प्रशासकीय सेवेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा ओढा असतो,या सगळ्यातून बाहेर पडत एखादी वेगळी वाट निवडणाराच यशस्वी होतो हे या दोघांनीही सिद्ध करून दाखवले...
डॉ.शिशिकांत नागटिळक यांनी आपल्या मनोगतातून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व यशस्वी विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच समाधान भैय्या गाजरे यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्व समजावून सांगितले, खेड भाळवणीचे शहाजी पाटील यांनी प्रशालेच्या स्पर्धा परीक्षेतील यशाचे कौतुक केले,प्रथमेश पवार यांनी आपण यशस्वी झालेल्या क्षेत्रात आपण कसा अभ्यास केला,यश कसे संपादन केले व या क्षेत्रात येणाऱ्या विध्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा..??हे त्यांनी पटवून दिले, तसेच तुषार लोकरे यांनी नौकरीच्या भरपूर संधी आहेत, अजून ही दहावी आणि बारावीच्या गुणांवर आपल्याला चांगली नौकरी मिळू शकते फक्त वेगळी वाट निवडण्याची आपली क्षमता पाहिजे हे आवर्जून सांगितले..!!
सनराईज पब्लिक स्कूल शेळवे नेहमीच असे विविध उपक्रम राबवून आपल्या विध्यार्थ्यांना प्रेरित करत असते,स्पर्धा परिक्षांमधून विविध पदांवर कार्यरत असलेल्या सन्माननीय व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचे यथायोग्य मार्गदर्शन विध्यार्थ्यांना दिले जाते त्यामुळे प्रत्यक्ष अनुभूतीतून विध्यार्थी घडत जातात.
शिष्यवृत्ती व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा प्रशालेच्या वतीने घेण्याचा एकमेव उद्देश विध्यार्थ्यांचा पाया भक्कम करणे व सराव हाच असतो असे आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेचे संस्थापक मुख्याध्यापक एस टी गाजरे यांनी नमूद केले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गायकवाड यांनी केले तर आभार प्रशालेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले...!!