पंढरपूर तालुक्यातील तब्बल १६१ प्रकरणी लोकअदालतध्ये निकाली.... २ कोटी ६० लाख रुपयांची वसुली....

लोकअदालतीसाठी एकुण ५ पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती.सदर लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.

पंढरपूर----प्रतिनिधी
प्रतिनिधी- आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल १६१ प्रकरणे तडजोडीअंती निकाली झाले व त्यामध्ये २ कोटी ६० लाख ९६ हजार ७५८ रुपये वसुली करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. एम. बी. लंबे यांनी दिली.
       प्रथम लोकअदातीचे उद्घाटन करणेत आले व लोकांमध्ये लोकअदालतीमध्ये लोकअदालतीचे असणारे महत्वाची माहिती देण्यात आली. सदर प्रसंगी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष श्री. भगवान मुळे व श्री. सुनिल यारगट्टीकर विधी स्वयंसेवक हे उपस्थित होते.

     लोकअदालतीसाठी एकुण ५ पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये पॅनल क्रमांक १ मध्ये श्री. एम. बी. लंबे, जिल्हा न्यायाधीश-१, पंढरपूर, पॅनल क्रमांक २ मध्ये श्री. एम. आर. जाधव, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पंढरपूर, पॅनल क्रमांक ३ मध्ये श्रीमती एस. ए. साळुंखे, ५ वे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पंढरपूर, पॅनल क्रमांक ४ मध्ये श्रीमती आर. जी. कुंभार, ४ थे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पंढरपूर व दाखलपूर्व प्रकरणांच्या पॅनल क्रमांक ५ मध्ये श्री. एस. एच. इनामदार, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, यांनी काम पाहिले.

   सदर लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form