अनोखा उपक्रमाने आपल्या पाल्याचा वाढदिवस शाळेतच साजरा केला
पंढरपुर येथील मुस्लिम समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी आपला पाल्य दानिशचा वाढदिवस त्याच्या शाळेतच साजरा केला. यानिमित्ताने शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. फक्त ४२ विद्यार्थ्यांची शाळा , अजित दादा प्राथमिक विद्यालय खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. कमी विद्यार्थी पण गुणवत्ता जास्त, अशा या शाळेत विद्यार्थी घडण्यास वेळ लागत नाही. पंढरपूर आता शैक्षणिक हब झाले आहे. नामांकित शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची चढाओढ असते. कमलीवाले यांनी मात्र आपल्या पाल्यासाठी हे विद्यालय निवडले आहे. वाढदिवसानिमित्त या शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मुलांना प्रथमोपचार पेटी आणि खाऊचे वाटप करण्यात आले. कमलीवाले यांच्या पत्नी शबनम कमलीवाले यांनी येथील शिक्षकांचा सन्मान केला.
अजितदादा पवार विद्यालयाच्या बाबतीत सांगताना मुख्याध्यापक संतोष अवताडे यांनी सांगितले की, प्रत्येक वर्गात कमाल पट ३० असला पाहिजे, अशी शैक्षणिक अट आहे. एवढा पट असल्यावरच प्रत्येक विद्यार्थ्यावर जातीनिशी लक्ष देता येते. आज मात्र प्रत्येक शाळेत १०० हून अधिक विद्यार्थी बसलेले दिसतात. मग विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस जॉईन करावे लागतात. या शाळेत प्रत्येक वर्गात किमान १० विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तेने युक्त आहे. या शाळेत कमलीवाले यांनी आपल्या मुलास पाठवले आहे. मुलाच्या वाढदिवशी शिक्षकांचा सन्मान करण्यामागे या शाळेची गुणवत्ता आहे.पंढरपूर शहरातील अजितदादा पवार प्राथमिक विद्यालय हे सन २००४ पासून पंढरपूरमध्ये सुरू झाले आहे . या विद्यालयात पालकांनी मुलांचा प्रवेश घ्यावा , गरीब व गरजू मुलांनी याचा अवश्य लाभ घ्यावा , या ठिकाणी मोफत शिक्षण देण्यात येते, असे आवाहन मुख्याध्यापक संतोष अवताडे यांनी केले आहे.याप्रसंगी सहशिक्षिका श्वेता खुळे, रोहिणी माने, रेहाना पटेल, सहशिक्षक सचिन गोरवे आदी शिक्षक गण उपस्थित होते.