शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद
संस्थेचे देणगीदार कै.प्रभाकर शंकर सुपेकर व श्री.अविनाश सिताराम वांगीकर या सभासदांनी दिलेल्या देणगीतून महर्षी याज्ञवल्क्य वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्था श्रीक्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने देणगीदार कै.प्रभाकर शंकर सुपेकर व श्री.अविनाश सिताराम वांगीकर यांनी दिलेल्या देणगी मधून ज्या दोन खोल्या बांधल्या त्याचे उद्घाटन समारंभ मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . त्यावेळी सभासदांचा विकास हा संस्थेचा विकास असे मत व्यक्त करताना मा प्रशांतराव परिचारक यांनी विचार मांडले , कार्यक्रमाचे अध्यक्ष ह .भ .प बाळशास्त्री हरिदास , संस्था कार्य अध्यक्ष श्री गजानन बिडकर व संस्थेचे अध्यक्ष वे.मू विद्याधर वांगीकर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी मा. प्रशांतराव परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना मनुष्य हा समाजामध्ये काम करताना कुठल्या ना कुठल्या संस्थेशी संलग्न असतोच ,परंतु ज्या वेळेस संस्था ही सभासदांचा विचार करते आणि संस्था विकसित होण्यासाठी सभासद हे देखील प्रयत्न करतात त्यावेळेस सभासदांबरोबर त्या संस्थेचा विकास हा नक्कीच होतो. असे मत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सभासद कै. प्रभाकर शंकर सुपेकर यांनी दिलेल्या दोन लाख रुपयां मधून आणि श्री अविनाश वांगीकर यांनी दिलेल्या दोन लाख पन्नास हजार रुपयां मधून संस्था संलग्न महर्षी याज्ञवल्क्य वेदपाठशाळेस खोल्या बांधण्यासाठी आणि वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्घाटन प्रसंगी श्री परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वेदघोषाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती विद्याधर वांगीकर यांनी केले प्रास्ताविकामध्ये संस्था संस्थापक पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर ,धर्मात्मा दत्तात्रय गंडाळे , धर्मभूषण दादासो बिडकर यांनी जे विचार सांगितले तेच विचार प्रमाण मानून संस्था कार्य करत आहे. शतक उत्तर असणं असणारी ही संस्था कार्याची व्याप्ती वाढवत समाजासाठी एक संघटन निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. ही संस्था कार्य करण्यासाठी समाजाच्या सेवेसाठी तत्पर आहे असे मत व्यक्त केले. तसेच देणगीदार कै. प्रभाकर शंकर सुपेकर यांचे सुपुत्र मिलिंद प्रभाकर सुपेकर ,सौ सरिता मिलिंद सुपेकर ,नातू चि. चैतन्य मिलिंद सुपेकर ,याप्रसंगी धनंजय एकनाथ कुलकर्णी,सौ. संजीवनी धनंजय कुलकर्णी ,अनिल नारायण वळसंगकर,सौ. संगीता अनिल वळसंगकर ,सोनाली अनिल वळसंगकर हे उपस्थित होते. श्री अविनाश सिताराम वांगीकर यांच्या कन्या सौ.सुप्रिया सचिन पुरोहित व जावई श्री .सचिन सुधाकर पुरोहित हे उपस्थित होते.
याप्रसंगी धनंजय एकनाथ कुलकर्णी यांनी संस्थेच्या पुढील कार्यासाठी दोन लाख रुपयाचा धनादेश संस्थेला प्रदान केला. त्याचप्रमाणे अनिल नारायण वळसंगकर यांनी वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ११ ब्लॅंकेट संस्थेस प्रदान केले.
या सत्कार समारंभ श्री मिलिंद सुपेकर यांनी मनोगत व्यक्त करताना आज माझ्या वडिलांमुळे मला हा सन्मान प्राप्त झाला. त्याबद्दल मी त्यांच्या रूणात राहिन असे मत व्यक्त केले. तर सौ .सुप्रिया पुरोहित वांगीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्था ही प्रत्येक सभासदाचे हित जपणे व सन्मान व गौरव करते याबद्दल मी संस्थेचा अभिमान बाळगते मत व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ कार्याध्यक्ष मा. श्री गजानन दादा बिडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये ज्यांनी ज्यांनी या संस्थेसाठी आजपर्यंत अविरत कार्य केले त्या सर्वांचा गौरव करत ही संस्था अजूनही पुढे कार्य करण्यास समर्थ आहे आणि समर्थ असणार आहे असा विचार आपल्या मनोगतमध्ये व्यक्त केला व संस्थेचा इतिहास व संस्थेच्या बद्दल ज्यांनी ज्यांनी अर्थसहाय्य केले .या सर्वांचा त्यांनी उल्लेख करून सर्वांनी संस्थेवर असेच प्रेम करावे असे मत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे मार्गदर्शक ह भ प बाळशास्त्री हरिदास यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगता मधून सांगताना संस्थेवर आजपर्यंत ज्यांनी सहकार्य व आर्थिक सहकार्य केले अशा सर्वांचे त्यांबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर आदरणीय कै. सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांचे संस्थेवरती स्नेह होता. त्याप्रमाणे आपलेही स्नेह या संस्थेवरती वृद्धिंगत असू द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली असे प्रतिपादन श्री प्रशांत परिचारक यांना आपल्या मनोगतून व्यक्त केला.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. बाळकृष्ण धाराशिवकर यांनी केले व सूत्रसंचालन श्री उन्मेश आटपाडीकर यांनी केले याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक व संस्थेवर प्रेम करणारे सभासद व नागरिक उपस्थित होते . सामुदायिक पसायदानाने व दुग्ध पानाने कार्यक्रमाची सांगता झाली.