पंढरपूर युवा मुद्रक संघटनेच्या अध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील तर सचिवपदी रामकृष्ण बिडकर

राष्ट्रीय समन्वयक  तेलंगणा ऑफसेट प्रिंटरचे श्री. दयाकरण रेड्डी व महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांच्या उपस्थितीत झाली निवड
पंढरपूर :(विनोद पोतदार)
येथील हॉटेल राधेश मध्ये पंढरपुरातील युवा मुद्रक संघटनेची कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. त्यात सर्वांनुमते अध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी बबनराव सुरवसे यांची निवड करण्यात आली.
       नुतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले सचिवपदी रामकृष्ण बिडकर, खजिनदार- श्रीराम रसाळ, सहसचिव मकरंद वैद्य, सहखजिनदार संतोष गोंजारी, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप भोरकर सदस्य- धनंजय उखळे, अमोल चव्हाण, मंदार केसकर, श्रीनाथ साळुंखे,गोपाळ भट्ट, उमेश वायचळ, गजानन कौलगी, रफिक नागठाण, दिलीप रसाळ, मोरे, शिवम पाटील, नानासाहेब यादव,  शंभू आलाट यांची निवड करण्यात आली.
.      याप्रसंगी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी प्रिंटिंग व्यवसायातील अडचणी व व्यवसायात मुद्रकांनी स्पर्धा न करता एकमेकांस सहकार्य करावे असे सांगितले. तद्नंतर हैदराबाद येथे होणार्‍या प्रिंटिंग मशिनरी प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आलेले  तेलंगणा ऑफसेट प्रिंटर असो. राष्ट्रीय समन्वयक  तेलंगणा ऑफसेट प्रिंटरचे श्री. दयाकरण रेड्डी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यात ते म्हणाले- अधिवेशनामध्ये जवळपास 125 मशिनरी स्टॉल असतील तर छोट्या मुद्रकांना मशीनचे स्पेअर पार्ट,शाई, कागद व इतर मटेरियल तसेच कागदा मधील अनेक प्रकार बघण्यास मिळतील. छोट्या मुद्रकांना डिजिटल प्रिंटिंगसाठी अनेक मशिनरी बघावयास मिळतील. या अधिवेशनात येणार्‍या मुद्रकांसाठी फ्रेश होण्यासाठी तसेच सामान ठेवण्यासाठी लॉकर, चहा, नाश्ता व एक वेळचे जेवण फ्री असणार आहे असेही ते म्हणाले.
    सदर कार्यक्रमात महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांचा सत्कार ज्येष्ठ मुद्रक श्रीरंग जाधव यांनी तर दयाकरण रेड्डी यांचा सत्कार उद्धव साळुंखे ज्येष्ठ मुद्रक यांनी हार व पांडुरंगाची मुर्ती देऊन केला तर श्रीरंग जाधव यांचा सत्कार बबन सुरवसे यांनी तर उध्दव साळुंखे यांचा सत्कार दयाकरण रेड्डी यांनी केला.
युवा मुद्रक संघाच्या अध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील यांची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगीराज ऑफसेटचे मालक मंदार केसकर यांनी केले. यावेळी सर्व मुद्रक बंधू मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form