सोलापूर विमान सेवा प्रकरणी सोलापूर विकास मंच च्या उपोषणास पत्रकार सुरक्षा समितीचा जाहीर पाठींबा

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विमान सेवा सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे 

सोलापूर (प्रतिनिधी )----
 सोलापूर विकास मंच वतीने होटगी रोडवरून नागरी विमान सेवा सुरु करण्यात यावी म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार विविध मंत्री त्याच बरोबर प्रशासन ला वेळोवेळी निवेदन पत्र व्यवहार करून देखील होटगीरोड वरून नागरी विमान सेवा सुरु न केल्याने अखेर सोलापूर विकास मंच वतीने प्रशासन ला जागं आणण्यासाठी चक्री उपोषण चे हत्यार उपसले असून सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर नागरी विमान सेवा बाबत बेमुदत चक्री उपोषणास सुरुवात केली असून विमान सेवा नसल्याने अनेक उद्योग धंदे बंद पडले असून सोलापूर मधील उच्च शिक्षित तरुण हाताला काम नसल्याने तो परराज्यात जात आहे तसेच विमान सेवा नसल्याने मोठे उद्योग सोलापूर मध्ये येत नाहीत राजकीय लोकांची कमालीची उदासीनता या विमान सेवा ला मारक ठरत असल्याने सोलापूर विकास मंच वतीने नागरी विमान सेवा बाबत चक्री उपोषण सुरु केलं असून या उपोषणास पत्रकार सुरक्षा समिती वतीने पाठिंबा दिला आहे
*विमान सेवा बाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार*
नागरी विमान सेवा बाबत सोलापूर विकास मंच वतीने सुरु करण्यात आलेल्या चक्री उपोषणास पत्रकार सुरक्षा समिती वतीने पाठिंबा दिला असून लवकरच नागरी विमान सेवा सुरु करण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा प्रशासन ला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिला आहे
       यावेळी शहर अध्यक्ष राम हुंडारे कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) संपर्क प्रमुख विश्व् नाथ खटावकर जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख प्रसिद्धी प्रमुख तथा धसका न्यूज चे संपादक अक्षय बबलाद  A R न्यूज चे वृत्तसंपादक समर्थ सोरटे युवा पत्रकार प्रसाद ठक्का श्रीनिवास कडवेरी शिवराज पडशेट्टी डॉ खंडागळे सह सोलापूर विकास मंच चे केतनभाई शहा आंनद पाटील विजय जाधव योगीन गुर्जर दत्ता अंबरे मनोज क्षीरसागर अनंत कुलकर्णी गणेश पेनगोंडा उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form