रासायनिक खताचा अतिरिक्त वापर म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा वापर करण्यासाठी सुपंत पोटॅश निर्मिती कारखान्याची उभारणी करण्यात आली
श्रीपूर : ---प्रतिनिधी
देशातील सहकारी साखर
उद्योगामध्ये पांडुरंग कारखान्याने बॉयलरमधुन निघणाऱ्या गरम वाफेवर स्पिन फ्लॅश ड्रायर हा आधुनिक प्रकल्प उभारुन स्पेंटवॉश पासून पोटॅशयुक्त खताची निर्मिती करणारा पांडुरंग सहकारी साखर कारखाना देशातील पहिला कारखाना ठरला आहे. जमिनीचा कस वाढविणे, शेतकऱ्यांचे हित तसेच प्रदूषणमुक्त कारखाना अशी त्रिसूत्री यातून साधली जाणार आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली
दिवसेंदिवस रासायनिक खताचा अतिरिक्त वापर होत असल्याने जमीनीची सुपीकता कमी होत आहे. त्याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना सेंद्रीय खतांचा वापर करण्यासाठी सुपंत पोटॅश निर्मिती कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार झिरो लिक्विड डिस्चार्ज करण्यासाठी रॉ स्पेंटवॉश वरती चालणारा स्पिन फ्लॅश ड्रायर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यामध्ये ९० लाख क्षमता असलेल्या डिस्टलरीज मधून निघणाऱ्या स्पेंटवॉशला ड्रायर केले जाते. त्या स्पेंटवॉशमध्ये चुना सल्फ्युरिक ऍसिड, अमोनिया व बॉयलरची राख योग्य प्रमाणात मिश्रण करून स्पिन फ्लॅश ड्रायर मधे प्रोसेस केले जाते.यामध्ये ४ ते ५ % इतकी पोटॅशची मात्रा आढळून आली असुन, त्याची विक्री पोटॅशयुक्त खत म्हणून शेतकऱ्यांना करीत आहोत. हा प्रकल्प बॉयलरमधून निघणाऱ्या हॉट फ्लु गॅसेसवरती चालत असल्याने अतिरीक्त स्टीम किंवा बगॅसची आवश्यकता नाही. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होते.