आबांच्या कार्यामुळेच तालुक्याची शान वाढवली सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न करीत राहिले
सांगोला ----प्रतिनिधी
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रथमत: अतिवृष्टी म्हणून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी सांगोला येथील स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले.
आजच्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी फक्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. परंतु सांगोल्यात आल्यानंतर त्यांनी शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले.
या दौऱ्यामध्येही त्यांनी स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कर्तृत्व विषयी बोलले होते. तालुक्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न करत,विकास साधला व तालुक्याची शान वाढवली तीच आता मान खाली घालण्याची वेळ आजच्या राजकीय परिस्थितीवर आली असल्याचे त्यांनी भाष्य केले होते. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या स्मृती स्थळी चंद्रकांत देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.