विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आपण निसर्गाचे घटक आहोत तसेच मानव व निसर्ग यात निसर्ग अग्रस्थानी असला पाहिजे ---सुनेत्राताई पवार
पंढरपूर : प्रतिनिधी
निसर्ग संवर्धन संस्था पंढरपूर व श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने आज शाळेमध्ये पक्षांची छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सचिवा माननीय सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पक्षीतज्ञ श्री बंडोपंत सबनीस, श्री श्रीकांत बडवे, श्री प्रकाश शेटे, श्री प्रेमचंद्र चोले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पक्षी सप्ताहाचे महत्त्व श्री प्रकाश शेटे सरांनी सांगितले. पक्षी तज्ञ श्री बंडोपंत सबनीस यांनी मानवाचे जन्मापासून मृत्यूपर्यंत पक्षाशी कसे नाते आहे ते सांगितले. खाटीक पक्षी खाद्य कसे टांगून ठेवतो? कोतवाल पक्षी आक्रमक कसा असतो? त्याच्या आश्रयाला इतर छोटे पक्षी कशी घरटी करतात तो कोतवाल्याचे काम कसे करतो ?याबद्दलची माहिती सरांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय सुनेत्रा ताई पवार म्हणाल्या 'आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी वेगळे देण्याचा प्रयत्न करतो की, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आपण निसर्गाचे घटक आहोत तसेच मानव व निसर्ग यात निसर्ग अग्रस्थानी असला पाहिजे आणि आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे . पक्षी छायाचित्र प्रदर्शनामध्ये 50 पेक्षा जास्त पक्ष्यांची ओळख विद्यार्थ्यांना झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्री महेश भोसले सर, श्री मुजावर सर ,श्री आगवणे सर, श्री साळुंखे सर यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आलनदीप टापरे सरांनी केले तर आभार प्र. मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सरांनी मानले.