सागरी जलतरणात सोलापूरच्या किर्ती भारडियाने केला विश्वविक्रम

मुंबईतील वरळी सी लिंक येथून पोहण्यास सुरुवात केली व ती गेटवे ऑफ इंडिया ३६ किलो मीटरचे अंतर अवघ्या ७ तास २० मिनिटात पूर्ण केले 

सोलापूर ---प्रतिनिधी
सोलापूरच्या किर्ती भराडिया यांने जलतरणपटूने 36 किलो मीटरचे अंतर सात तास वीस मिनिटात पूर्ण करून सागरी जलतरणात विश्वविक्रम केला आहे.किर्तीने आज गुरुवारी सकाळी 11. 50 वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून पोहण्यास सुरुवात केली व ती गेटवे ऑफ इंडिया येथे संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पोहोचली. यासाठी तिने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलाव येथे दररोज सहा ते सात तास सराव केला आहे. विशेष म्हणजे मागील एक महिन्यापासून मुंबई येथील समुद्रातसुद्धा तिने पोहण्याचा सराव केला आहे.या विक्रमाचे परीक्षण करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यासाठी तिला सोलापुरातील प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले. 
   
    या विक्रमासाठी स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर या संस्थांचेतिला सहकार्य लाभले.सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश देशमुख, मानद सचिव पार्वतय्या श्रीराम, रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष कालिदास जाजू, प्रशिक्षक श्रीकांत शेटे तसेच श्यामसुंदर भराडिया, जयेश पटेल यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form