कॉटेज हॉस्पिटल पंढरपूर येथे नुकतेच प्रसूती झालेल्या महिला भगिनींसाठी मॅटरनिटी पॅडचे वाटप---रोटरी क्लब अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे
पंढरपूर: प्रतिनिधी
महिला सक्षमीकरण आणि महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या कडून मॅटरनिटी पॅडचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून कॉटेज हॉस्पिटल पंढरपूर येथे नुकतेच प्रसूती झालेल्या महिला भगिनींसाठी मॅटरनिटी पॅडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये रो. डॉ. संगीता पाटील, रो. डॉ. क्षितिजा पाटील यांनी महिला भगिनींना आरोग्य विषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कॉटेज हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, नर्सेस व सेवा कर्मी, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, सचिव रो. सचिन भिंगे, रो. किशोर निकते, रो. किशोर सोमाणी व सर्व रोटरी क्लबचे सदस्यउपस्थित होते.