श्री विठ्ठल कारखान्यावर कै. यशवंतरावजी चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी

 कै. यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपूर्वक पुजा संचालक श्री संभाजी ज्ञानोबा भोसले, कालिदास रघुनाथ पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले

पंढरपूर ---
 वेणुनगर- गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व धुरंधर राष्ट्रीय नेते भारताचे माजी उपपंतप्रधान कै. यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपूर्वक पुजा संचालक श्री संभाजी ज्ञानोबा भोसले, कालिदास रघुनाथ पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी डॉ. विश्वासराव मोरे यांनी आपले विचार व्यक्त करता म्हणाले की, कै. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवून महाराष्ट्रमध्ये सहकार रुजविणेसाठी मोलाचे कार्य केले.
सदर कार्यक्रमास स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बी. पी. रोगेसर, कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वापाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्के, प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, श्री विठ्ठल प्रशालेचा स्टाफ तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कै. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form