दिवंगत आमदार भारत भालके यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त पुष्पवृष्टी व रक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूर ----
मंगळवेढा - पंढरपूर तालुक्याचे आमदार स्व.भारत भालके यांच्या व्दितीय पुण्यस्मरणा निमित्त श्रध्दांजलीपर कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती स्व. भारतनाना भालके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रणिता भालके यांनी दिली आहे. सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.०० वा. सरकोली येथील निवासस्थानी वै. भारत भालके यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून
त्याच दिवशी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदविण्याचे आयोजन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
नानांचा दांडगा जनसंपर्क आणि लोकांना हाताळण्याची विशिष्ट पद्धत आजही चर्चेचा केंद्रबिंदू आहे यामुळे तीन निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांतून लढूनही स्व. आमदार भारत भालके यांना पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेने स्वीकारले होते.त्यांनी स्वतःचे वलय निर्माण केले होते.आतापर्यंत पंढरपुरातील राजकारण ऊसा भोवती मंगळवेढ्याचे राजकारण पाण्याभोवती फिरत राहिले आहे.
वै.भारत भालकेंना मानणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, कामगार,ऊस उत्पादक शेतकरी ,छोटे व्यापारी तसेच साखर कारखान्यातील अडचणी दूर करणेसाठी जनतेत राहून काम करा तसेच मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी मतदारसंघातील गाठी-भेटी घेऊन, वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करा, असा सल्ला व मार्गदर्शन भगीरथ भालके यांना केले.
यावेळी बंधू व्यंकट भालके, शेखर भालके, पत्नी डॉ. प्रणिता भालके यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते मतदारसंघातील विविध कार्यक्रमांचे नियोजनाची जबाबदारी निष्ठावंत कार्यकर्ते यांच्याकडे दिली आहे.