पंढरपूर--(विनोद पोतदार)
शेतकऱ्यांचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि.
वेणुनगर-गुरसाळे, ता.पंढरपूर, जि. सोलापूर या साखर कारखानाच्या ४१वा गळीत हंगाम शुभारंभ रविवार, दि.१६/१०/२०२२ रोजी सकाळी ११वा. मा.ना.प्रविण दरेकर माजी विरोधी पक्षनेते व विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते होणार असून यासाठी कार्यक्रमास सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, साखर आयुक्त मा शेखर गायकवाड साहेब, राज्य सहकारी बँकेचे संचालक अविनाश महागांवकर अशा दिग्गज तज्ञ मंडळी यांच्या हस्ते गळीत हंगाम शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती प्र. कार्यकारी संचालक दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
चेअरमन अभिजित पाटील, व्हा.चेअरमन सौ.प्रमलता रोंगें यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार व विठ्ठल सहकारी साखर कारखाना हितचिंतक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.