#चौकट#
*पंढरपूर शहरातील ठिकठिकाणी रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत त्यात भरपूर प्रमाणात पाणी साठते
*गजानन महाराज मंदिर जवळील पार्किंग, तसेच इतरही ठिकाणी पार्किंग सुविधा आहे याठिकाणी हि पावसामुळे दलदल निर्माण झाली आहे
*प्रदक्षिणा मार्गावर हि पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठते यापुर्वी पाणी साठूनये म्हणून नगरपालिकाने उपाययोजना केल्या होत्या परंतु त्या तकलादू ठरल्या आहेत
* शहरातील भाजी मंडई देखील घाणीचे साम्राज्य पसरले आहे
*विठ्ठल भक्त, वारकरी, यात्रेकरू तसेच येथे असणारे विविध वारकरी मंडळी यांचे मठ व येथे त्यांना लागणाऱ्या सेवा सुविधा यांचा पुरता बोजवारा उडाला आहे
_-----------_--------------_--------------_--------
पंढरपूर : (विनोद पोतदार)
शहरात काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचत असून रस्त्यावर चिखल, घाणीचे साम्राज्य पसरले आहे . तानाजी चौक, संभाजी चौक ,जुनी माळी गल्ली ,उमदे गल्ली येथे थोडा जरी पाऊस पडला तरी गुडघाभर पाणी साचते पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन वेळा नगरपालिकेने पाईप व गटारीचे नियोजन केले लाखो रुपये खर्च झाले पण या ठिकाणी पाण्याचा निचराच होत नाही त्यामुळे या भागात डासाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.तुडुःब भरलेल्या गटारीतील पाण्यात नगरपालिकेने औषध फवारणी करावी. पाण्यामुळे रस्त्यावर कचरा वाहत येतो. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी सर्व सामान्य नागरिक व रहिवाशी यांनी केली आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातही जोरदार पाऊस झाला आहे. पावसाचे पाणी खराब रस्त्यावर साचत आहे यामुळे पादचारी व वाहन धारक जीव मुठीत घेऊन रहदारी करताना दिसतात. त्यातच विठुरायाच्या दर्शनासाठी येणारा भाविक भक्त, वारकरी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे वाहन तळावर तर अक्षरशः दलदल निर्माण झाली आहे, दुर्गंधी पसरत आहे. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगरपालिकेने याकडे गांभीर्याने पहावे. डासांचे प्रमाण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्वरित धुराडी मशीनद्वारे फवारणी करून घ्यावी,व विषेश उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांतून होते आहे