करकंब येथे आंतरराष्ट्रीय किर्तीचे कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांचे श्रवणीय कीर्तन

श्रीराम प्रतिष्ठान करकंब एक तप वर्धापन दिनानिमित्त आयोजन
करकंब ----(लक्ष्मण शिंदे)
*श्रीराम प्रतिष्ठान करकंब या अध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला १२ वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने बुधवार दिनांक २नोव्हेंबर रोजी रात्री ९:००वा. शाकंभरी गार्डन चौंडेश्वरी मंदिर येथे आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचे श्रवणीय कीर्तन ऐकायला मिळणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे व श्रीराम प्रतिष्ठान वतीने करण्यात येत आहे.
     श्रीराम प्रतिष्ठान करकंब संस्था दिनांक १०-१०-१० या वर्षी स्थापन करण्यात आली या संस्थेचे संस्थापक मिलिंद उकरंडे माजी अध्यक्ष धनंजय इदाते यांच्या कालावधीतील संस्थेच्या माध्यमातून अनेक विविध अध्यात्मिक, सांस्कृतिक,व सामाजिक उपक्रम राबविले त्यामध्ये श्रीराम संगीत महोत्सव,१३तासात १३कोटी रामनाम जप,भागवत कथा,रामकथा,आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिर, मेडिकल कॅम्प,योग शिबिर, दुष्काळात टॅकरने पाणी वाटप, गोरगरीबांना शिधा वाटप,सलग ११वर्ष रक्तदान शिबिर,या सर्व उपक्रमांना करकंब ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अभिनेते,गायक, व्याख्याते, नाटककार म्हणून ख्याती असलेल्या आदरणीय चारुदत्त आफळे बुवा यांच्या कीर्तनाचा लाभ करकंब व करकंब पंचक्रोशीतील रसिक श्रोत्यांनी घ्यावा त्यांना साथसंगत ज्ञानेश्वर दुधाणे वैभव केंगार शिवराज पंडीत यांची लाभणार आहे,शाकंभरी गार्डन मध्ये आयोजन करण्यात आले असून जर पाऊस पडला तर शेजारीच चौंडेश्वरी मंदिरात आयोजन होईल, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान अधिक परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form