ऐतिहासिक वारसा आणि इतिहासाच्या खुणा असलेलं करकंब...... इतिहास संशोधक नितीन आणवेकर यांची गावाला भेट....

माहिती नसणाऱ्या गोष्टींची माहिती मिळाली,
करकंब येथील विठ्ठल मंदिर समोरील ऐतिहासिक वास्तू बारव .ही बारव फार वर्षांपूर्वीची असून या इथं असणाऱ्या विष्णू च्या मुर्ती वरुन दिसून येते,या बारवत एकूण १६ देवाष्टक आहेत त्यामध्ये पूर्वीच्या काळात निश्चित देवांच्या मूर्त्या असणार अशी वास्तू जपण आपलं आद्य कर्तव्य आहे असे सांगितले.

करकंब---- (लक्ष्मण शिंदे)
सोलापूर येथून करकंब येथे इतिहास संशोधक नितीन अणवेकर यांनी करकंब गावातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तूचे संशोधन करून त्याची माहिती घेऊन करकंब गावातील
, माहिती नसणाऱ्या गोष्टींची माहिती मिळाली,
करकंब येथील विठ्ठल मंदिर समोरील ऐतिहासिक वास्तू बारव .ही बारव फार वर्षांपूर्वीची असून या इथं असणाऱ्या विष्णू च्या मुर्ती वरुन दिसून येते,या बारवत एकूण १६ देवाष्टक आहेत त्यामध्ये पूर्वीच्या काळात निश्चित देवांच्या मूर्त्या असणार अशी वास्तू जपण आपलं आद्य कर्तव्य आहे असे सांगितले.
 रोझातील महादेव मंदिर असलेली पूरातन बारव नितीन अणवेकरांच्या संशोधनात सोलापूर जिल्ह्यातील एकमेव बारवा असेल की इतकं सुंदर बारवशेजारी महादेवाचे मंदिर आहे,परंतू याकडे दुर्लक्ष असल्याने घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. 
 

       करकंब मधील महादेव मंदिर (व्यवहारे गल्ली)हे मंदिर जास्त पूरातन नसलं तरी आतील दगडांच्या बांधकामावरुन २-३शे वर्षांपूर्वीच असेल असं सांगितलं,त्यानंतर मंदिराच्या समोर असलेल्या विरघळ आपण त्याला (शनिदेव)म्हणून तेल घालतो तर त्याची आपल्याला माहिती नसणारी महिती अतिशय सुंदररित्या सांगितली,ती व्हिडिओ मध्ये पहा.
करकंब मधील थोरली वेस ही पूरातन असून त्याचा जिर्णोद्धार करण्यात काम पूरातन वास्तूला धक्का न‌ लावता करत आहेत याचा आनंद वाटला,इतिहासाची खुप मोठी खुण असलेली ही करकंब मधील वेस आहे,असे सांगितले.
 महादेव मंदिरापुढून रस्त्यान जात असताना अमर चव्हाण यांच्या आडाशेजारी अर्धवट दगडावर असलेली घडण पाहुन त्यांनी सांगितले की गावाला काडीची परंपरा आहे का.अतिशय महत्वपूर्ण शिवा असून अर्धवट दुसरा दगड बघ त्यावर त्यांची माहिती असेल असं सांगितलं.
 विठ्ठल मंदिर शेजारील नागरी गारुडे यांच्या परिसरातील १२०० वर्षांपासूनच अतिशय पुरातन असलेल मंदिर पाहण्यात आलं .भग्न अवस्थेतील ह्या मंदिराचा जिर्णोद्धार केला तर अतिशय सुंदररित्या मंदिर तयार होईल त्याची माहिती  मंदिराची कोरीव दगडांवरुन सांगितली.
 
    भजलिंग महाराज मठ पाहिला तेही जास्त पुरातन नसलं तरी बांधकाम अतिशय मजबूत असून तीन-चारशे वर्षांपूर्वी च असण्याची शक्यता आहे,तेथील ऐतिहासिक बारवचही यायचे कंपाऊंड केलं तरीही  अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते,लोक तिथं कचरा टाकत आहेत हे अतिशय वाईट आहे,अशा ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करणे आपले कर्तव्य आहे.
कनकंबा माता मंदिर परिसरात आम्हीं गेलो असता मंदिर बंद असल्याने आत जाता आलं नाही परंतू बाहेर असणाऱ्या सतीची शिळा पाहिली (व्हिडिओ पहा) त्यावरुन त्या शिक्षेची माहिती समजली खुप छान वाटलं,की आपल्या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे याचा अभिमान वाटतो पण तो जपण्यासाठी प्रत्येक गावच्या व्यक्तिंनी पुढाकार घेऊन त्यांची जोपासना केली पाहिजे.यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांची स्वच्छता ठेवण गरजेचं आहे त्यासाठी थोडीफार जागर स्वच्छता अभियान टीमच्या माध्यमातून  स्वच्छता केली जातेय परंतू याकडे कायमस्वरूपी लक्ष असते तेवढंच महत्त्वाचं आहे असं वाटतं*
युगंधर आखाडा टीम च्या माध्यमातून भविष्यकाळात ऐतिहासिक वास्तूंच एक वास्तू संग्रहालय असावं या उद्देशाने झपाटलेला तरुण राजू अनवते यांनी अनेक शस्त्रांची माहिती सांगितली.तलवारी मध्ये असलेले वेगवेगळेप्रकार,भाला,अडकित्ते,जुनी नाणी,अशा अनेक विविध गोष्टींची माहिती मिळाली.अशा ऐतिहासिक वस्तू कोणाकडे असतील तर त्या ऐतिहासिक वस्तू जपण्यासाठी आमच्याकडे द्यायात त्याची संग्रहालयात ठेवण्यासाठी आणि नवीन पिढीला माहिती होईल यासाठी राजु अनवते यांनी आवाहन ही केलं.
हे सगळं पाहत असताना दोन तीन तास कसे गेले हे समजली नाही आपल्या गावची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे एवढं मात्र जाणवलं यासाठी सर्वांनी मिळून जर पूराव्यासहीत प्रयत्न केला तर नक्कीच करकंब गावचा इतिहास यासाठी उपयोग पडेल अशी आशा वाटते, यासाठी बरोबर नागनाथ घाटुळे सर, दत्तात्रय खंदारे सर,आणि ज्ञानेश्वर दुधाणे सरांनी वेळ देऊन नितीन अनवेकर सरांना ऐतिहासिक वास्तू दाखवण्यासाठी सहकार्य केले,आणि त्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडली,पुढील काळात करकंब गावची पाच भागांत डाक्युमेंटरी काढण्यासाठी आणि तो पूर्ण महाराष्ट्रात दाखवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितीन अणवेकर यांनी सांगितले. वारसा आणि इतिहासाच्या खुणा असलेलं आपलं करकंब गाव




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form