पंढरपूर शहरातील *तुकाराम भवन पाठीमागे बडवे गल्ली* येथील सर्व
खड्डे *मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने बुजवण्यात आली*,,
शहरात पावसामुळे सर्वच भागात प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .अनेक नागरिकांचे या खड्ड्यामुळे अपघात झालेले आहेत, दोन महिला या भक्तिमार्गाकडून येणारा रस्ता ब्लड बँकेसमोर समोरच्या खड्ड्यामध्ये पडून जखमी झाले आहेत.
परंतु नगरपालिकेला जाग येत नाही म्हणून पंढरपूर शहरातील सर्व खड्डे *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने सिमेंट काँक्रेट ने बुजवण्यास सुरुवात करण्यात आली* .अनेक भागातील खड्डे बुजवले आहेत.
दोन दिवसांपूर्वी बडवे गल्ली येथील माता भगिनींनी, नागरिकांनी खड्डे बुजवण्याची मागणी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या कडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार येथील सर्व खड्डे बुजवण्यात आले.यावेळी *कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुंणभाऊ कोळी, नगरसेवक संजय बंदपट्टे,मनसे शहर अध्यक्ष संतोष कवडे,नगरसेवक शिवाजी मस्के, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले, मनसे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळणेरकर,साईनाथ बडवे, छोटू पवार, सुरज देवकर ,नागेश इंगोले ,संतोष बोडके, साईनाथ बडवे ,मंगेश मंजुळ, ज्ञानेश्वर बोंबलेकर ,मयूर पिंपळनेरकर, सिद्धार्थ बोडके ,नितीन अवताडे ,आशिष बडवे, विनायक बडवे ,चेतन पेटकर इत्यादी उपस्थित होते*.