कोर्टी येथे विविध विकास कामाचे उद्घाटन जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले

महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता व मज्जिदजवळ खोलीचे  बांधकाम काम करण्याचा तसेच मारुती मंदिरासमोरील पेवर ब्लॉक व ग्रामपंचायत जवळील पेवर ब्लॉक अशा विविध विकास कामे 

पंढरपूर ----(विनोद पोतदार)
तालुक्यातील कोर्टी येथे विविध कामाचे महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता व मज्जिदजवळ खोलीचे  बांधकाम काम करण्याचा तसेच मारुती मंदिरासमोरील पेवर ब्लॉक व ग्रामपंचायत जवळील पेवर ब्लॉक अशा विविध विकास कामाचे उद्घाटन जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले, कोर्टी येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र शंभू महादेवाचे यात्रा उत्सव काळात मानाच्या देवाची कावडी, मुर्ती वाजत गाजत वडापात्र मार्गे महादेव मंदिराकडे नेल्या जाता होत्या परंतु गेली 20 ते 25 वर्ष हा रस्ता बंद होता हा रस्ता शेंबडे यांच्या शेतातून जात होता शेंबडे कुटुंब यांनी मोठे मन दाखवून हा रस्ता पुन्हा पूर्ववत करण्याचा विचार केला म्हणून हा रस्ता पूर्ण होण्यास मदत झाली.
   तसेच मुस्लिम समाज बांधवांनी सुद्धा मोठे मन दाखवून मज्जिद  समोरील रस्ता रुंदीकरणास आडवी येणारी  खोली पाडून रस्ता रुंदी करण्यास मुस्लिम बांधवांचे मोठे सहकार्य लाभले आहे, या कार्यक्रमात युवा नेते प्रणव परिचारक, बाबासाहेब पवार, पांडुरंग कारखान्याचे संचालक भैरू माळी, माजी सरपंच रघुनाथ वाघमारे ,बाबासाहेब पवार तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पवार, गणपत लवटे ,कोर्टीचे युवा सरपंच रघु पवार, उपसरपंच महेश येडगे, माजी उपसरपंच राजू पवार ,माजी सरपंच रामभाऊ मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य गोरख शेंडगे ,पोपट हाके बबलू शेख, सिकंदर मुलाणी ,अनिश मनेरी, बाळू होनकडे ,मुन्ना शेख, सत्यवान मस्के, मधुकर वाघमारे ,भारत पवार राजाराम माळी ,तात्या करंडे ,संजय माने, राजेंद्र कुलकर्णी ,महादेव चव्हाण ,दत्तात्रय कोळेकर ,सुरज लवटे, सुनील देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form