येथील श्री. मोहन शामराव हुंगे माजी मुख्याध्यापक यांचे चिरंजीव डॉ. शिवराज व डॉ. पुजा यांना वैद्यकीय क्षेत्रातील डी.एम. (डॉक्टरेट ऑफ मेडीसीन) या सर्वोच्च पदवीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत हे दाम्पत्य उत्तीर्ण झाले आहे. डॉ. शिवराज यांनी डी.एन्.बी. मेडीसीन नंतर डी.एम्. न्यूरॉलॉजी ही पदवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तिरूनेलव्हेली तामीळनाडू येथून प्राप्त केली आहे.
डॉ. पूजा यांनी एम्.डी. नंतर वैद्यकीय क्षेत्रातील जिरियाट्रीक मेंटलहेल्थ या विषयात डी.एम्. ही पदवी प्राप्त केली आहे. या विषयात डी.एम्. ही पदवी प्राप्त केलेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश, लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडीकलविद्यापीठ येथून हे शिक्षणपूर्ण केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.