अद्ययावत मोबाईल व्हॅन रक्त संकलनासाठी सोलापूर येथे सज्ज .....


   सोलापूर येथे  उद्या गांधी जयंतीदिनी ही व्हॅन लोकार्पण होत आहे .
संग्रहित फोटो 

सोलापूर - (सौ.दै.सांज) इंडियन रेडक्रॉस सोसायटी दिल्लीनं सोलापूरच्या शाखेस ८० लाख रुपये किंमतीची अद्ययावत मोबाईल व्हॅन रक्त संकलनासाठी मोफत दिली आहे. ही बस उद्यापासून रक्तदात्यांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. आज पत्रकार परिषदेत सोलापूर शाखेचे चेअरमन डॉ. राजीव प्रधान, सचिव जयेश पटेल  यांनी ही माहिती दिली.


संग्रहित फोटो 
       इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूर शाखेच्या या बसमध्ये रक्तदात्यांकरिता ५ मुव्हेबल बेड, २ ब्लड स्टोरेज फ्रिज, चेकअप किट, लॅपटॉप, टिव्ही, ऑक्सिजन सिलिंडर, फायर एक्सिटंगिशर यासर अनेक सुविधा असून विद्युत पुरवठा बंद पडल्यास युपीएस सिस्टमही आहे. ही बस आल्यामुळे आता रक्तदान शिबीर घेणाऱ्यांना मंडप हॉल घेणं गरजेचं नाही. गृहसोसायट्या, आठवडा बाजार, गावोगावी सार्वजनिक ठिकाणी काही क्षणातच रक्त संकलन सुरु करता येईल. उद्या गांधी जयंतीदिनी ही व्हॅन लोकार्पण होत आहे. सकाळी ९ वाजता चार पुतळा येथे कार्यक्रम  होणार आहे. पत्रकार परिषदेस खुशाल देढीया, संदीप जव्हेरी, गुरुलिंग  कन्नुरकर, राजीव देसाई, अमरजा थिटे, अशोक नावरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form