औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाने केली पंढरपूर MIDC जागेची पाहणी

प्रथम कोर्टी हद्दीतील, नंतर कासेगाव हद्दीत उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी करण्यात आली, तदनंतर हे पथक अनवली आणि रांजणी परिसरातील जागेची पाहणी करण्यात  आली 



पंढरपूर ---(विनोद पोतदार)
 सोमवारी औद्योगिक विकास महामंडळाचे पथक पंढरपूर मध्ये दाखल झाले पथकासमवेत आ. समाधानअवताडे, मनसे नेते दिलीप धोत्रे ,माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित कोर्टी, कासेगाव, रांजणी, येथिल जागेची केली पाहणी .
           गुरुवारी उद्योग मंत्रालयाच्या दालनात यासंदर्भात बैठक पार पडली होती. या बैठकीसही आ. समाधान अवताडे,मनसे नेते दिलीप धोत्रे उपस्थित होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंढरपूर एमआयडीसीच्या मुद्द्यास प्राधान्य दिले असून, त्याच दिवशी १९ सप्टेंबर रोजी एमआयडीसीच्या जागेची पाहणी करण्याचे धोरण ठरले होते. ठरल्याप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळाचे पथक पंढरपुरात सोमवारी दाखल झाले.या पथकाचे स्वागत येथील शासकीय विश्रामगृहात, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी  केले. यावेळी त्यांच्या समवेत कोळी महासंघाचे नेते अरुण कोळी, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे, नगरसेवक संजय बंदपट्टे, मनसेचे शहर अध्यक्ष संतोष कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्रथम कोर्टी हद्दीतील, नंतर कासेगाव हद्दीत उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी करण्यात आली, तदनंतर हे पथक अनवली आणि रांजणी परिसरातील जागेची पाहणी करण्यात  आली .
या पथकाच्या प्रमुख औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी बिरजे मॅडम यांनी प्रत्येक ठिकाणच्या जागेची पाहणी करत बारकावे टिपले. पुढील काही दिवसात कोणती जागा योग्य आहे, याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि येथील प्रतिनिधी ठरवणार आहेत.यावेळी प्रांत अधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, वीज वितरण कंपनी चे भुतडा इत्यादी उपस्थित होते.
पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न
फार जुना आहे. याकरता दिवंगत आ. भारत भालके यांनीही प्रयत्न केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर आमदार समाधान अवताडे, मनसे नेते दिलीप धोत्रे  यांनी नेटाचे प्रयत्न केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form