रयत शिक्षण संस्था, सातारा आणि आयसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळेचे उद्घाटन
पंढरपूर:
रयत शिक्षण संस्था, सातारा, व भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्थेतील शाळांमधील इनोव्हेशन कोचेस तयार करण्यासंदर्भात तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळा पंढरपूर येथे यशस्वीरित्या सुरू झाली. या कार्यशाळेचे प्रयोजन हे RISE उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नवोपक्रम, STEM शैक्षणिक आशय ज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर मार्गदर्शन करणे आहे. ह्या कार्यशाळेनंतर, शिक्षक शाळेतील मुलांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न 7। इनोवेशन मॉडेल, प्रशिक्षण पद्धत, सत्राच्या संकल्पना, पद्धती आणि धोरणे यांच्या द्वारे करतील. सर्व सत्रांचे नियोजन दुसऱ्या टप्यातील इंनोव्हेशन चैम्पिअन्स, (श्री, विशाल हगरे, श्रीमती सुषमा बर्गे, श्रीमती राजश्री गवळी) तसेच IRISE टीम (सोनल थोरवे, जहिदा शेख, शिवानी पुळसे यांच्या द्वारे घेण्यात येईल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, आयसर पुणे, ब्रिटिश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित आयराईझ (IRISE) टीचर डेव्हलमेंट प्रशिक्षणच्या तिसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय कॅस्केड प्रशिक्षण दि. सप्टेंबर 68, 2022 दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. श्री. एन. टी. निकम, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, सौ. अनिता साळवे, मुख्याध्यापक यशवंत विद्यालय, ह्यांच्या सह श्रीम, सोनल थोरवे, सौ. जहिदा शेख, सौ. शिवानी पुळसे, IRISE प्रोग्राम, आयसर पुणे यांचा सहभाग लाभला.
जिल्ह्यातील 36 गणित व विज्ञान शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सर्व
सहभागी शिक्षकांना गणित व विज्ञान शिकविण्यास उपयोगी अशा क्रियाकलापांसाठी उपयोगी असे किट्स,
तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल. सदर कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. श्री शिंदे, प्रा. श्री सुरेश पवार, मा. श्री
अवताडे प्रा. श्री काटकर, प्रा. श्री. मोरे व प्रा. श्री आर. एस. पवार उपस्थित होते.